आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: सल्लूसोबत काम करून या अॅक्ट्रेसने मिळवली लोकप्रियता, मात्र बॉलिवूडमध्ये झाली अपयशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री भूमिका चावला)
मुंबई: अभिनेत्री भूमिका चावलाने आज वयाचे 37 वर्षे पूर्ण केले आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलेली भूमिका दक्षिणेत यशस्वी अभिनेत्री आहे. भूमिकाचा जन्म 21 ऑगस्ट 1978 रोजी नवी दिल्लीच्या पंजाबी कुटुंबात झाला. तिचे वडील ए. एस चावला आर्मी ऑफिसर आणि आई बाली चावला शिक्षिका आहे. भूमिकाचे बालपणीचे नाव रचन आहे. तिला प्रेमाने गुडिया म्हणतात.

दिल्लीमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर 1997मध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला गेली. हळू-हळू तिला जाहिराती आणि अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळू लागली. फेअर अँड लव्हली, डाबर लाल तेलसारख्या प्रॉडक्टच्या जाहिराती केल्यानंतर तिला अदनाम स्वामी आणि उदित नारायणसारख्या गायकांच्या अल्बममध्ये गायनाची संधी मिळाली. जाहिरातीमधून मिळालेली लोकप्रियतेने तिला तेलगू सिनेमांमध्ये काम मिळू लागले. तिने 2000मध्ये 'युवाकुडु' या तेगलू सिनेमामध्ये काम केले. 'खुशी' (2001) सिनेमासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये 9 सिनेमे केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. 2003मध्ये तिने 'तेरे नाम' या सुपरहिट सिनेमात तिने सलमान खानसह काम केले. या सिनेमात तिने मेघनाचे पात्र साकारले होते. सलमानसह तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली. या सिनेमाच्या यशानंतर तिला 'रन', 'दिल ने जिसे अपना कहा', 'सिलसिले', 'दिल जो भी कहे', 'फॅमिली', 'गांधी माय फादर'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु हे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. सिनेमांच्या अपयशाने भूमिकाचे बॉलिवूडमधील करिअर संपुष्टात आले. दक्षिणेत तिचा दबदबा आजही कायम आहे.

बॉलिवूडमध्ये मिळेलेल्या अपयशानंतर भूमिकाने बॉयफ्रेंड प्रसिध्द योगगुरू भरत ठाकूरशी लग्न केले. दोघे दिर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यांना आता एक मुलगादेखील आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भूमिका चावलाची खास छायाचित्रे...