आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बॉलिवूड अभिनेत्रीने पायलटसोबत थाटला संसार, बुलेटने निघाली होती वरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: लग्नादरम्यान बाइकवरून गुल पनागची विदाई झाली होती. - Divya Marathi
फाइल फोटो: लग्नादरम्यान बाइकवरून गुल पनागची विदाई झाली होती.
चंदीगड- आज अर्थातच 3 जानेवारी अभिनेत्री गुल पनागचा वाढदिवस आहे. विविध अंदाजासाठी ओळखली जाणारी गुल पनागने 13 मार्च 2011ला ऋषी अत्रीसोबत लग्न केले. गमतीशीर गोष्ट म्हणजे, त्यांच्या लग्नाची वरात बुलेटने निघाली होती. वधूची म्हणजेच गुल पनागची विदाईसुध्दा याच बुलेटमधून झाली होती. ऋषी पेशाने पायलट आहे. दोघेही बाइक रायडिंगचे शौकीन आहेत.
व्हायरल झाला बुलेट रायडिंग फोटो...
गुल नेहमी एनफील्ड बुलेट चालवताना दिसते. 2014च्या लोकसभा निवडणूकीदरम्यान चंदीडमध्ये बुलेट कॅम्पेनचा तिचा फोटो खूप व्हायरल झाला होता. ती 'आप' पक्षाची उमेदवार होती. निवडणूकीतील तिचा हा अंदाज लोकांना खूप भावला होता. चंदीगड निवडणूक लढल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणूकीत गुल बाइकने पक्षाचा प्रचार करतना दिसली होती.
असे आहे आयुष्य
गुल अभिनयातून राजकारणात उतरली. तिचा जन्म 3 जानेवारी 1979ला चंदीगडमध्ये झाला. तिचे वडील आर्मीमध्ये लेफ्टिनेंट जनरलच्या पोस्टवर होते. त्यामुळे गुल देशातील अनेक शहरांत राहिली आहे. आर्मी बॅकग्राऊंडमुळे तिचे शालेय शिक्षणसुध्दा विविध ठिकाणी झाले. ती शिक्षणादरम्यान स्पोर्ट्स आणि पब्लिक स्पीकिंगमध्येसुध्दा एक्सपर्ट होती.
मिस इंडिया ठरली होती गुल-
2003मध्ये 'धूप' सिनेमातून गुलने बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. ती ‘डोर’, ‘धूप’, ‘मनोरमा, सिक्स फीट अंडर’ आणि ‘टर्निंग 30’ सिनेमांतील आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिने 1999मध्ये मिस इंडियाचा किताब नावी केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड अभिनेत्री गुल पनागची खास छायाचित्रे...