आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : एकेकाळी अशी दिसायची ऐश्वर्या राय बच्चन, तुम्ही पाहिलेत का तिचे हे 27 PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः ऐश्वर्या राय बच्चन हिने आज वयाच्या 45 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 1 नोव्हेंबर 1973 रोजी मंगळूरू, कर्नाटकात जन्मलेल्या ऐश्वर्याने बालपणी आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र मोठे होताहोता ती मॉडेलिंगकडे आकर्षित झाली. मॉडेलिंगची पहिली संधी तिला नवव्या वर्गात शिकत असताना मिळाली. कॅमलिन कंपनीसाठी ऐश्वर्याने पहिल्यांदा मॉडेलिंग केले होते. त्यानंतर कोक, फूजी आणि पेप्सी या ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्ये तिने काम केले आणि सोबत शिक्षणसुद्धा सुरु ठेवले. ऐश्वर्या एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिने पेप्सी आणि कोक या दोन प्रतिस्पर्धी ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केले आहे.
 
1991मध्ये जिंकली होती सुपरमॉडेल कॉन्टेस्ट...
मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ऐश्वर्याने 1991मध्ये सुपरमॉडेल कॉन्टेस्ट जिंकली होती. फोर्डद्वारा आयोजित ही स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर ऐश्वर्याला व्होग या आंतरराष्ट्रीय मॅगझिनच्या कव्हरपेजवर स्थान मिळाले होते. 1993 मध्ये अभिनेता आमिर खानसोबत पेप्सीच्या जाहिरातीत झळकल्यानंतर ऐश्वर्या चर्चित चेहरा बनली. 1994मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याचे आयुष्यच पालटून गेले.
 
अभिनयापेक्षा प्रभावी राहिले मॉडेलिंग...
जाणकारांनुसार, सिनेमांपेक्षा ऐश्वर्याची जादू मॉडेलिंग क्षेत्रात जास्त चालली. मॉडेलिंगमुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता प्राप्त झाली. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्‍ड्सची ती ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनली. त्यामुळेच 2003 मध्ये तिला 'कान' या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दरवर्षी ऐश्वर्या कानच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत असते.

ऐश्वर्याचे एंडोर्समेंट्स..
कॅमलिन पेन्सिलपासून सुरु झालेला ऐश्वर्याचा प्रवास आजही यशस्वीपणे सुरु आहे. टाइटन वॉचेज, लॉन्जिस वॉचेज, लॉरियल, कोका-कोला, लॅक्मे कॉस्मेटिक्स, फिलिप्स, पामोलिव, लक्स, फूजी फिल्म्स, नक्षत्र डायमंड्स, कल्याण ज्वेलर्स, प्रेस्टीज यांसारख्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्ससाठी ऐश्वर्याने काम केले आहे.

आज ऐश्वर्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तिच्या फॅन्ससाठी घेऊन आलो आहोत, तिच्या मॉडेलिंग काळातील छायाचित्रांचा खजिना. ही सर्व छायाचित्रे ऐश्वर्याच्या मॉडेलिंग करिअरच्या काळातील आहे. सुमारे 20 वर्षे जुनी ही छायाचित्रे आहेत. 

चला तर मग पाहुयात, अतिशय रेअर अशी ऐश्वर्याची मॉडेलिंगच्या काळातील Unseen छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...