आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: पूजा, शिल्पा, रविना, प्रियांका.. बरीच मोठी आहे 'खिलाडी कुमार'च्या गर्लफ्रेंडची लिस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आज (९ सप्टेंबर) वयाची ४९ वर्षे पूर्ण केली आहेत. ९ सप्टेंबर १९६७ मध्ये अमृतसरमध्ये जन्मलेला अक्षय टि्ंवकलसोबत लग्न करण्यापूर्वी साखरपुडा करण्यासाठी प्रसिध्द होता. अक्षय कुमारसोबत अफेअर्सची यादी मोठी आहे. त्याने अॅक्शन हीरो म्हणून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली होती, परंतु सर्व प्रकारचे सिनेमे करतो. तसेच अक्षय कुमारच्या सिनेमांप्रमाणेच अफअर्सच्या चर्चासुध्दा तेवढ्यात होत्या.

अक्षय कुमारचे मॉडेल आणि अभिनेत्री पूजा बत्रा, शिल्पा शेट्टीपासून रेखा आणि प्रियांका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अफेअरचे किस्से गाजले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अक्षयकडून मिळालेल्या धोक्यानंतर एका मुलाखतीत सांगितले होते, की अक्षयने तिचा वापर केला. मात्र आता दोघांमधील नाते सामान्य आहे.

एकेकाळी अक्षय कुमारच्या प्रेमाचे किस्से खूप प्रसिध्द होते. त्याकाळच्या प्रत्येक प्रसिध्द अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जुळले होते. रविना टंडन आणि शिल्पा शेट्टीसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा इतक्या लोकप्रिय झाल्या होत्या, की दोघींपैकी एकिशी अक्षय लग्न करणार असे वाटत होते. परंतु अखेर त्याने टि्ंवकल खन्नासोबत गाठ बांधली. 17 जानेवारी 2001ला अक्षय कुमार आणि टि्ंवकल खन्ना लग्नगाठीत अडकले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण-कोणत्या अभिनेत्रींसोबत होते अक्षय कुमारचे अफेअर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...