आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PIX: मदन आणि चमन पुरींचे सख्खे भाऊ होते अमरिश पुरी, व्हिलन नव्हे व्हायचे होते हीरो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरिश पुरी, चमन पुरी आणि मदन पुरी - Divya Marathi
अमरिश पुरी, चमन पुरी आणि मदन पुरी
मुंबईः 'मोगॅम्बो' नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अमरिश पुरी बॉलिवूडमध्ये हीरो होण्याचे स्वप्न बाळगून मुंबईत आले होते. पण हीरोऐवजी ते प्रसिद्ध खलनायक बनले. अमरिश पुरी यांना आजही बॉलिूडचा बेस्ट व्हिलन समजले जाते. बॉलिवूडचा हा खलनायक आज या जगात नाही. अमरिश पुरी आज आपल्यात असते, तर त्यांनी वयाची 85 वर्षे पूर्ण केली असती.

सिनेमात काम न मिळाल्याने LICमध्ये नोकरी करायचे अमरिश... 
- अमरिश पुरी यांना मोठे भाऊ  होते.  मदन पुरी आणि चमन पुरी ही त्यांची नावे होती.  दोघेही अमरीश यांच्यापुर्वी अभिनय क्षेत्रात स्थिरावले होते.   
- दोन्ही सख्खे भाऊ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते असूनदेखील अमरिश यांच्यासाठी सिनेसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता. हीरो बनण्याचे स्वप्न बघून मुंबईत दाखल झालेले अमरिश पहिल्या स्क्रिन टेस्टमध्ये अपयशी ठरले होते.
-  सिनेमांत काम मिळत नसल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी भारतीय जीवन वीमा निगम (LIC) मध्ये नोकरी केली होती. 
- वीमा कंपनीत नोकरी करण्यासोबतच त्यांनी पृथ्वी थिएटरमध्ये काम सुरु केले होते.
- रंगभूमीवर काम करत असताना हळूहळू ते टीव्ही जाहिरातींकडे वळले आणि सिनेमांमध्ये व्हिलनच्या भूमिकेत झळकले.
 
वयाच्या 39व्या वर्षी मिळाला बॉलिवूडमध्ये रोल...
- अमरीश पूरी यांना बॉलिवूडमध्ये पहिली भूमिका वयाच्या 39व्या वर्षी मिळाली होती. 
- सुनील दत्त आणि वहीदा रहमान स्टारर 'रेशमा और शेरा' सिनेमात त्यांनी रहमत खान नावाच्या व्यक्तीचे पात्र साकारले होते. 
- त्यांचे खलनायकाच्या रुपातील सिनेमांमध्ये वेगवेगळे गेटअप आजही लोकांच्या लक्षात आहेत. 'अजूबा'मधील वजीर-ए-आला, 'मि. इंडिया'मधला मोगॅम्बो, 'नगीना'मधला भैरोनाथ, 'तहलका'मधला जनरल डोंगचा गेटअप लोक आजही विसरलेले नाहीत.  
 
ब्रेन हॅमरेजमुळे झाले होते निधन
- 22 जून 1932 रोजी लाहोर, पंजाब (आता पाकिस्तान) मध्ये जन्मलेल्या अमरीश 12 जानेवारी, 2005 रोजी ब्रेन हॅमरेजमुळे प्राणज्योत मालवली होती. 
- त्यांचा मृत्यू मुंबईत झाला होता. जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा अनेक वृत्तपत्रांचे मथळे 'मोगॅम्बो खामोश हुआ' असे होते. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा, अमरिश पुरी यांच्या आयुष्याशी निगडीत खास गोष्टी... 
बातम्या आणखी आहेत...