आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 27 वर्षांची झाली अनुष्का शर्मा, बालपणीमध्ये दिसायची काहीशी अशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अनुष्का शर्मा)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज (1 मे 2015) 27 वर्षांची झाली आहे. 1 मे 1988 रोजी अनुष्काचा जन्म अयोध्या, उत्तर प्रदेशमध्ये झाला. तिचे वडील कर्नल कुमार शर्मा एक आर्मी ऑफिसर आहेत आणि आई आशिमा शर्मा होममेकर आहे. आई-वडिलांशिवाय अनुष्काला एक मोठा भाऊ असून त्याचे नाव कारनेश आहे. अनुष्काने आर्मी स्कूलमधून आपेल शिक्षण पूर्ण केले आणि माऊंट कारमेल कॉलेज, बंगळुरुमधून तिचे पदवी शिक्षण पूर्ण केले. अनुष्काचे कुटुंबीय सध्या बंगळुरुमध्ये राहतात.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का मुंबईला रवाना झाली आणि मॉडेलिंगच्या स्पर्धेत उतरली. 2007मध्ये तिला मॉडेलिंगमध्ये पहिला ब्रेक मिळाला. यादरम्यान तिने लॅक्मे फॅशन वीकसाठी वेंडेल रोड्रिक्ससाठी मॉडेलिंग केली होती. 2008मध्ये तिने बॉलिवूडमध्ये केली. आदित्य चोप्राच्या दिग्दर्शनाखाली तयार होणा-या 'रब ने बना दी जोडी' हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. यामध्ये शाहरुख खान तिचा को-स्टार होता. सिनेमा सुपरहिट ठरला आणि अनुष्काचे करिअर ट्रॅकवर आले.
आज ती बॉलिवूडची मोस्ट डिमांडिंग अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 'बँड बाजा बारात' (2010), 'जब तक है जान' (2012) आणि 'पीके' (2014)सारख्या जवळपास 9 सिनेमांमध्ये काम केले आहे. यावर्षी रिलीज झालेल्या 'एनएच 10' या सुपरहिट सिनेमातून अनुष्काने निर्माती म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. तिच्या अभिनयाने सजलेले 'बॉम्बे वेलवेट' आणि 'दिल धडकने दो' सिनेमेसुध्दा यावर्षी रिलीज होणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुष्काचे बालपणीचे निवडक PHOTOS...