आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ही आहे अर्जुन कपूरची बहीण अंशुला, भावासोबत असे घालवले बालपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः धाकटी बहीण अंशुला कपूरसोबत अभिनेता अर्जुन कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने आज वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. 26 जून 1985 रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचा अर्जुन मुलगा आहे. श्रीदेवीसोबत लग्न करण्यासाठी बोनी यांनी मोना यांना घटस्फोट दिला होता. अर्जुनशिवाय बोनी आणि मोना यांची एक मुलगी असून अंशुला हे तिचे नाव आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुले आई मोनाजवळच राहिली. 25 मार्च 2012 रोजी मोना यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बहीण अंशुलाची सर्व जबाबदारी अर्जुनच्या खांद्यावर आली आहे.
अंशुलाने काढला अर्जुनच्या नावाचा टॅटू
यावर्षी वर्ल्ड सिबलिंग डेच्या निमित्ताने अर्जुन कपूरला एक खास गिफ्ट मिळाले. त्याची बहीण अंशुलाने या खास दिवसाच्या निमित्ताने अर्जुनच्या नावाचा टॅटू काढून घेतला. हिंदीत अर्जुनचे नाव लिहिले आहे. टॅटूचा फोटो अंशुलाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करुन ट्विट केले, ''हॅपी सिबलिंग डे. आयुष्याच्या प्रत्येक चढउतारात तू मला सांभाळले, हिंमत दिली. प्रत्येक दुःखापासून तू मला दूर ठेवले. तू जिथे आहे, तिथे मी सुरक्षित आहे.''
सोशल साइट्सवर अॅक्टिव राहते अंशुला
अंशुला कपूर सोशल साइट्सवर अॅक्टिव आहे. अंशुला स्वतःची आणि अर्जुनची छायाचित्रे नित्यनेमाने शेअर करत असते. या फोटोजमध्ये बालपणीपासून ते आत्तापर्यंतच्या आठवणींचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बालपणीपासून ते आत्तापर्यंतची अंशुलासोबतची अर्जुनची खास छायाचित्रे....