आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलिंगच्या दिवसांत असा होता बिपाशाचा लूक, बालपणी म्हणायचे \'लेडी गुंडा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 2001मध्ये रिलीज झालेल्या 'अजनबी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बिपाशा बसु 37 वर्षांची झाली आहे. 7 डिसेंबर 1979ला नवी दिल्ली जन्मलेली बिपाशा आज बी-टाऊनची सर्वात बोल्ड आणि सेक्सी अभिनेत्री मानली जाते. परंतु बिपाशाच्या सांगण्यानुसार, बालपणी ती काळी-सावळी आणि लठ्ठ होती. त्यावेळी कुणीच तिला सुंदर मानत नव्हते. एका मुलाखतीत बिपाशाने सांगितले होते, की शालेय दिवसांत तिची कमांडिंग पर्सनालिटीमुळे प्रत्येकजण तिला घाबरत होता. प्रेमाने लोक तिला 'लेडी गुंडा' म्हणत होते.
अर्जुन रामपालच्या पत्नीच्या सल्ल्यानंतर बनली मॉडेल...
अभिनेत्रीसोबतच बिपाशा एक यशस्वी मॉडेलसुद्धा आहे. बातम्यांनुसार, बिपाशाचे मॉडेलिंग क्षेत्रातील पदार्पणाचे श्रेय अभिनेता अर्जुन कपूरची पत्नी आणि माजी सुपरमॉडेल मेहर जेसियाला जाते. कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये बिपाशा आणि मेहरची भेट झाली होती. तेव्हा मेहरनेच बिपाशाला मॉडेलिंग क्षेत्राचा विचार करण्याचा सल्ला दिला होता. मेहरच्या सल्ल्यानुसार बिपाशा या क्षेत्राकडे वळली आणि यश प्राप्त केले. या क्षेत्रा येऊन तिने यश मिळवले. 1996मध्ये तिने 'गोदरेज सिंथोल' सुपरमॉडेल कॉन्टेस्ट आणि 'द फोर्ड मॉडेल्स सुपरमॉडेल ऑफ द ईअर' स्पर्धा जिंकली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा बसुच्या मॉडेलिंग दिवसांतील PHOTOS...