आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

49 वर्षांचा झाला बॉबी देओल, 21 वर्षांत एवढा बदलला LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉबी देओल - Divya Marathi
बॉबी देओल
मुंबई- बॉबी देओल 49 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 27 जानेवारी 1967ला मुंबईमध्ये झाला. बॉबीने करिअरची सुरुवात 1995मध्ये 'बरसात' सिनेमातून केली. या सिनेमासाठी त्याला उत्कृष्ट फिल्मफेअर डेब्यू पुरस्कार मिळाला होता. परंतु मागील काही वर्षांपासून तो कठिण काळात जगत आहे. त्याचा लास्ट रिलीज होम प्रॉडक्शनचा 'यमला पगला दीवाना 2' होता. गेल्या तीन वर्षांपासून तो सिल्वर स्क्रिनपासून दूर आहे.
खासगी आयुष्यात राहिला यशस्वी...
बॉबी देओल सिनेमांत यशस्वी ठरला नसला तरी खासगी आयुष्यात यशस्वी झाला आहे. त्याने बालपणीची मैत्रीण तान्यासोबत लग्न केले. तान्या स्वत: कॉस्ट्युम डिझाइनर आहे. त्यांना दोन मुले आहेत. अलीकडेच बंगळुरुमध्ये क्रिकेट लीगदरम्यान बॉबी दिर्घकाळानंतर दिसला होता. यावेळी त्याला ओळखणेदेखील कठिण झाले होते. आपल्या करिअरविषयी बॉबीचे म्हणणे आहे, की तो सध्या अनेक स्क्रिप्ट वाचत आहे. त्यामधील काहींवर बोलणे फायनल झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉबी देओलचे फॅमिलीसोबतचे निवडक फोटो...