आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special Bollywood Actor Tusshar Kapoor Childhood Photos

39 वर्षांचा झाला जितेंद्रचा लाडका मुलगा, Photos मध्ये पाहा तुषारचे बालपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील जितेंद्र आणि थोरली बहीण एकतासोबत तुषार कपूर - Divya Marathi
वडील जितेंद्र आणि थोरली बहीण एकतासोबत तुषार कपूर
एन्टरटेन्मेंट डेस्कः 20 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. तुषार बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा आणि टीव्ही क्वीन एकता कपूरचा धाकटा भाऊ आहे. तुषारच्या आईचे नाव शोभा कपूर असून त्या प्रसिद्ध निर्मात्या आहेत. यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधून शिक्षण पूर्ण केलेल्या तुषारचा जन्म 20 नोव्हेंबर 1976मध्ये झाला.
पदार्पणातच मिळाला पुरस्कार
तुषारने आपल्या करिअरला 2001मध्ये करीना कपूर स्टारर 'मुझे कुछ कहना है' सिनेमातून सुरुवात केली. आपल्या पहिल्याच सिनेमात उत्कृष्ट अभिनयसाठी त्याला उत्कृष्ट पदार्पणाच्या (अभिनेता) फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. मात्र दोन वर्षांत 'क्या दिल ने कहा', 'ये दिल', 'जिना सिर्फ मेरे लिये', 'कुछ तो है' ही फ्लॉप सिनेमे तुषारच्या पदरी पडली. 2004मध्ये 'गायब'मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी तुषारची प्रशंसा झाली. पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये त्याच्या नावाची चर्चा सुरु झाली. तुषारला पहिले सर्वात मोठे यश 2006मध्ये आलेल्या रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' सिनेमातून मिळाले. त्यानंतर त्याने 'गोलमाल'च्या दोन्ही सिक्वेलमध्ये काम केले. तसेच 2011मध्ये आलेल्या 'द डर्टी पिक्चर'मध्ये विद्या बालनसोबत एका छोट्या भूमिकेत दिसला होता.
धमाकेदार एन्ट्रीनंतर करिअरला लागली उतरती कळा
तुषार कपूर बॉलिवूडच्या अशा अभिनेत्यांमध्ये सामील आहे, ज्याची फिल्म इंडस्ट्रीमध्ये धमाकेदार एंट्री झाली होती. परंतु पुढे त्याच्या करिअरचा आलेख खाली घसरत गेला. एक काळ असाही आला, की तुषारकडे होम प्रॉडक्शनव्यतिरिक्त दुसरे सिनेमेच शिल्लक राहिले नव्हते. स्पष्ट आहे, की स्टार पुत्र आणि स्टार बहिणीचा भाऊ असूनदेखील त्याला कामासाठी मेहनत करावी लागत होती. सोलो भूमिकाच नव्हे सिनेमातील छोट्या-छोट्या भूमिकांसाठीसुध्दा तुषारला संघर्ष करावा लागला होता.
आगामी काळात तुषार 'मस्तीजादे', 'क्या कूल है हम 3' आणि 'रन भोला रन' या सिनेमांमध्ये झळकणार आहे.
तुषारच्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com वाचकांना तुषारच्या बालपणीची निवडक छायाचित्रे दाखवत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, तुषारचे बालपण...