आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 वर्षांची झाली दीया मिर्झा, 5 वर्षांच्या डेटिंगनंतर अडकली लग्नाच्या बेडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः माजी मिस एशिया पॅसिफिक आणि बॉलिवूड अभिनेत्री-निर्माती दीया मिर्झा 35 वर्षांची झाली आहे. 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या दीयाने 2000 साली एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी केला होता. 2000 मध्ये तिने पहिल्यांदा 'खोया खोया चांद' या व्हिडिओत अभिनय केला होता. त्यानंतर 2001 मध्ये आर. माधवनसोबतच्या 'रहना है तेरे दिल मे'मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमातील अभिनयानंतर दीयासाठी सिनेसृष्टीचे दार खुले झाले होते. दीयाने 'दीवानापन' (2001), 'तुमको न भूल पाएंगे' (2002), 'दम' (2003), 'परिणीता' (2004), 'फिर हेरा फेरी' (2005), 'लगे रहो मुन्नाभाई' (2006) आणि 'किसान' (2008) या सिनेमांत काम केले. दीया अभिनेत्री होण्यासोबतच एक निर्मातीदेखील आहे. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या बॉबी जासूस या सिनेमाची ती निर्माती होती. या सिनेमात विद्या बालन मेन लीडमध्ये होती.
दोन वर्षांपूर्वी अडकली लग्नगाठीत-
दीया मिर्झा 18 ऑक्टोबर 2014 रोजी बॉयफ्रेंड साहिल सिंघासोबत लग्नगाठीत अडकली. साहिल सिंघा बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम करतो. त्याने 'लव्ह, ब्रेकअप, जिंदगी' सिनेमा दिग्दर्शित केला होता. तसेच, 'सलाम-ए-इश्क'मध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. दीया-साहिल यांचे एक बॉर्न फ्री एन्टरटेन्मेंट प्रॉडक्शन हाऊससुध्दा आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दीया-साहिलच्या लग्नाची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...