आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special Bollywood Actress Ileana DeCruise Turns 28

B'DAY: 28 वर्षांची झाली इलियाना, IT प्रोफेशनलला करतेय डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवू़डची क्युट अभिनेत्री इलियाना डिक्रूज 28 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 1 नोव्हेंबर 1987ला मुंबईच्या समीरा डिक्रूज आणि रोनाल्डो डिक्रूज यांच्या घरी झाला.
मॉडेलिंग जगातून सिनेमांत आलेल्या इलियानाने वयाच्या 19व्या वर्षीच 'देवदासू' या तेलगू सिनेमातून करिअरला सुरुवात केली. या सिनेमासाठी तिला बेस्ट न्यूकमर ऑफ साऊथ फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिने 'पोकरी', ‘जलसा’, ‘किक’, ‘जुलाई’ आणि ‘ननबन’सारख्या हिट सिनेमांत काम केले.
बॉलिवूडमध्ये एंट्री-
2013मध्ये तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या 'बर्फी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा होती. 'बर्फी'मध्ये श्रुतीच्या पात्रासाठी इलियानाला उत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचे 4 पुरस्कार मिळाले.
'बर्फी'नंतर इलियाना 'फटा पोस्टर निकसा हीरो' 'मै तेरा हीरो', आणि 'हॅपी एंडिंग' सिनेमांत झळकली.
ऑस्ट्रेलिअन IT प्रोफेशनलला करतेय डेट-
इलियाना मागील अनेक वर्षांपासून एंड्रयू नीबोन नावाच्या ऑस्ट्रेलिअनला डेट करत आहे. तो एक आयटी प्रोफेशनल आणि फोटोग्राफर आहे. बातम्यांनुसा, ही जोडी पुढील वर्षी लग्नगाठीत अडकणार आहे.
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह-
इलियाना सिनेमांशिवाय सोशल मीडियावरसुध्दा खूप अॅक्टिव्ह असते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून divyamarathi.com आम्ही दाखवत आहोत इलियानाचे निवडक ग्लॅमरस फोटो...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इलियानाचे काही ग्लॅमरस फोटो...