आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special Bollywood Actress Sonali Bendre Turned 40

40 वर्षांची झाली सोनाली बेंद्रे, पाहा तिचे कुटुंबीयांसोबतचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून सोनाली बेंद्रे, उजवीकडे पती गोल्डी आणि मुलगा रणवीरसोबत सोनाली - Divya Marathi
डावीकडून सोनाली बेंद्रे, उजवीकडे पती गोल्डी आणि मुलगा रणवीरसोबत सोनाली
सोनाली बेंद्रे 40 वर्षांची झाली आहे. 1 जानेवारी 1975ला मुंबईमध्ये जन्मलेल्या सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनालीने अभिनेत्री म्हणून 1994मध्ये रिलीज झालेल्या 'आग' सिनेमातून पदार्पण केले होते. हा सिनेमा फ्लॉप झाला, परंतु सोनालीला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टारर सिनेमांत काम केले.
सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही तरी तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान (इंग्लिश बाबू देशी मेम), सलमान खान (हम साथ साथ है) आमिर खान (सरफरोश), अमिताभ बच्चन (मेजर साहब), अजय देवगण (दिलजले, जख्म) आणि अक्षय कुमार (तराजू) यांची नावे सामील आहेत.
निर्मात्यासोबत थाटला संसार-
सोनालीने 2002मध्ये निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले. 2005मध्ये तिने एका मुलाल जन्म दिला, त्याचे नाव रणवीर आहे.
11 वर्षांत केले 30 सिनेमे-
सोनालीने आपल्या 11 वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास 30 सिनेमे केले. शिवाय तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी सिनेमांतसुध्दा काम केले आहे. 2003मध्ये रिलीज झालेल्या 'कल हो ना हो' सिनेमानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दहा वर्षानंतर 2013मध्ये रिलीज झालेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' सिनेमातून सोनालीने कमबॅक केले.
छोट्या पडद्यावर केली एंट्री-
कमबॅक केल्यानंतर सोनालीने छोट्या पडद्यावर एंट्री केली. तिने 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' शोमध्ये जजची भूमिका केली. त्यानंतर 'आजीब दास्ता है ये' या डेली सोपमध्येही काम केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करूव पाह सोनालीचे फॅमिलीसोबतचे काही फोटो...