आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 वर्षांची झाली \'शाकालाका बूम-बूम\' गर्ल, बॉलिवूडमध्ये फेल, आता टॉलिवूडमध्ये करतेय काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[हंसिका मोटवानी (बालपण आणि तारुण्यातील छायाचित्रे)]
मुंबई - वयाच्या 10 व्या वर्षी 'शाकालाका बूम बूम' या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एन्ट्री घेणारी हंसिका मोटवानी आज (9 ऑगस्ट) आपला 24वा वाढदिवस साजरा करत आहे. हंसिकाने वयाच्या 16 व्या वर्षी मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले. तिने मोजक्या हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मिळाली आहे. आज ती दक्षिणेची नामवंत अभिनेत्री बनली आहे.

9 ऑगस्ट 1991 रोजी मुंबईत जन्मलेल्या हंसिकाचे वडील बिझनेसमन तर आई डर्मेटोलॉजिस्ट आहे. तिला एक भाऊ असून त्याचे नाव प्रशांत आहे. हंसिकाची मातृभाषा सिंधी आहे.
हंसिकाने मुंबईतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणि इंटरनॅशनल क्यूरिकुलम स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. हंसिका सामाजिक कार्यात सक्रिय आहे. ती सध्या 25 अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलत असून 10 निराधार महिलांना उपचाराच्या सुविधा पुरवत आहे. शहरांमध्ये स्तन कॅन्सरविषयी सुरु असलेल्या 'चेन्नई टर्न्स पिंक' या उपक्रमाची ती ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.

वयाच्या 10व्या वर्षी अभिनयाला सुरुवात...
वयाच्या 10व्या वर्षी हंसिकाने दूरदर्शनवरील गाजलेल्या 'शाकालाल बूम बूम' (2000-2004) या मालिकेद्वारे आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. ही एक फिक्शन मालिका होती. या मालिकेत हंसीकाने शूनाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

या टीव्ही मालिकांमध्ये केले काम :
>>शाकालाका बूम-बूम (2001)
>>देश में निकला होगा चांद (2001-2003)
>>क्योंकि सास भी कभी बहू थी (2002)
>>सोन परी (2002)
>>करिश्मा का करिश्मा (2003)
>>हम दो हैं न (2004-05)

बॉलिवूडमध्ये पदार्पण...
हंसिकाने छोट्या पडद्याप्रमाणेच मोठ्या पडद्यावरसुद्धा बालकलाकाराच्या रुपात एन्ट्री घेतली होती. 2003 मध्ये रिलीज झालेल्या 'हवा' या सिनेमात तिने तब्बूच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिला खरी ओळख प्राप्त झाली ती हृतिक स्टारर 'कोई मिल गया' या सिनेमामुळे. या सिनेमात हंसिकाने हृतिकच्या मैत्रीणीची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर ती 'आबरा का डाबरा'(2003), 'जागो'(2004) आणि 'हम कौन हैं'(2004) या सिनेमांमध्येही बालकलाकार म्हणून काम केले.

वयाच्या 16 व्या वर्षी हिरोईन म्हणून झळकली...
2007 मध्ये हंसिका हिमेश रेशमिया स्टारर 'आप का सुरुर' या सिनेमात लीड अभिनेत्री म्हणून झळकली. त्यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती. मात्र हंसिकाचा डेब्यू बॉलिवूड सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर 2008 मध्ये गोविंदासह ती मनी है तो हनी है या सिनेमात झळकली. हा सिनेमासुद्धा फारसा गाजला नाही. बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्याने तिने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवला. येथे ती यशस्वी ठरली. कन्नड, तामिळ, तेलगू भाषांमध्ये तिने जवळजवळ 28 सिनेमे केले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील हंसिका प्रसिद्ध चेहरा असून अनेक अवॉर्ड्स आपल्या नावी केले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा बर्थ डे गर्ल हंसिकाची निवडक खासगी छायाचित्रे...