Home »Gossip» Birthday Special : College Friends Disclose Unheard Facts On Birthday Of Amitabh

B'day : 60 वर्षे जुन्या मित्रांनी सांगितले बिग बींचे शालेय जीवनात किस्से, फर्स्ट क्रश अन् बरंच काही

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 12:39 PM IST

पुणे / जयपूर / चंदिगड / लखनऊ / नैनिताल : ..माझ्या जीवनातील सर्वात आनंदी काळ शेरवूडमधला आहे. मी आज जे काही आहे, ते मी शेरवूड कॉलेजमुळेच बनू शकलो आहे. याठिकाणी मी 3 वर्षे घालवली आहेत.. 17 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात हे बोलताना अमिताभ यांचे डोळे पाणावले होते. 1956 पासून 1958 पर्यंत 3 वर्षे त्यांनी नैनितालच्या याच कॉलेजमध्ये 9th पासून 11th पर्यंतचे शिक्षण घेतले. या कॉलेजसाठी अमिताभच्या मनात खास स्थान असल्याने त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या जीवनातील याच तीन वर्षांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पोहोचलो, नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये. याठिकाणाहून आम्ही त्यांच्याबरोबर शिकलेल्या त्यावेळच्या 5 मित्रांना शोधले. त्यापैकी काहीजण आजही अमिताभ यांच्या थेट संपर्कात आहेत.
मीडियामध्ये प्रथमच असे झाले आहे की, अमिताभ यांचे 5 शालेय मित्र एकत्र अमिताभ यांच्या शालेय जीवनातील काही खास किस्से सांगत आहे. वाचा, रोहिताश्व कृष्ण मिश्राचा हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट...

पहिला किस्सा-बॉलीवूडच्या महानायकाला कोणत्या महिलेने शिकवली अभिनयाची ABCD
कोणी सांगितले : क्लासमेट सुखपाल सिंह बाजवा
आज काय करतात : रिटायर्ड स्क्वॉर्डन लीडर
कुठे राहतात : जीरकपूर, पंजाब
- 1956 मध्ये शेरवूड कॉलोजदरम्यान अमिताभ यांचे स्वप्न बॉलिवूडमध्ये जाण्याचे नव्हे तर नोकरी करण्याचे होते. थिएटरकडेही त्यांचा ओढा कॉलेजात आल्यावर वाढला.
- इंग्लंडमध्ये जन्मलेल्या अॅक्ट्रेस Jennifer Kendall चा एक थिएटर ग्रुप 'पृथ्वी' आमच्या कॉलेजात येऊन नाटकांचे बारकावे शिकवायचा. त्याच ग्रुपची प्रेरणा घेत बिग बींनी अभिनय शिकायला सुरुवात केली. हा ग्रुप दरवर्षी उन्हाळ्यात कॉलेजमध्ये येऊन Milman Hall मध्ये प्रशिक्षण द्यायचा.
- नंतर अमिताभ यांचे मन थिएटरमध्ये एवढे रमायला लागले की, शेरवूडमधील 3 वर्षांच्यादरम्यान झालेल्या 3 अॅन्युअल फंक्शनपैकी 2 वेळा त्याने बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळवला.
- नंतर अमिताभ यांनी स्वतः मान्य केले होते की, Kendall च्या ग्रुपमुळे त्यांना थिएटरकडे येण्याची प्रेरणा मिळाली आणि येथेच त्यांनी अॅक्टींगची ABCD शिकली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 16 व्या वर्षी कुणावर होता अमिताभ यांचा फर्स्ट क्रश.. आज कुठे आहेत त्या..
कंटेंट इनपुट : यूपीमधून रवी श्रीवास्तव आणि चंदिगडहून विकास शर्मा.
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended