आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वयाच्या 13व्या वर्षी 30 वर्षांनी मोठ्या डान्सरसोबत झाले होते सरोज खानचे लग्न, नवरा होता विवाहित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 2000हून अधिक गाणी कोरिओग्राफ करणा-या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी वयाची 69 वर्षे पूर्ण केली आहेत.  22 नोव्हेंबर 1948 रोजी किशनचंद सद्धू सिंह आणि नोनी ​सद्धू सिंह यांच्या घरी जन्मलेल्या सरोज यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधु सिंह नागपाल आहे. फाळणीनंतर सरोज यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाले होते. वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी बालकलाकार म्हणून  'नजराना' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 

 

वयाच्या अवघ्या 13 वर्षी अचानक झाले होते सरोज यांचे लग्न...

सरोज खान यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार करत 43 वर्षीय डान्स मास्टर बी सोहनलालसोबत लग्न केले होते. सरोज यांच्यापेक्षा वयाने 30 वर्षे मोठे असलेल्या सोहनलाल यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांना पहिल्या लग्नापासून चार मुले होती. एका मुलाखतीत सरोज यांनी सांगितले होते,  वयाच्या 13 वर्षी मी शाळेत जात होती. त्यावेळी लग्नाचा अर्थसुद्धा मला समजत नव्हता. एकेदिवशी त्यांचे डान्स मास्टर सोहनलाल यांनी त्यांच्या गळ्यात काळा धागा बांधला होता. काळा धागा बांधल्यामुळे लग्न झाल्याचे सरोज यांना वाटले होते. 


नव-याने लपवली होती विवाहित असल्याची गोष्ट...
शाळेत जायच्या वयात सरोज यांचे सोहनलालसोबत लग्न झाले होते. त्यावेळी सोहनलाल विवाहित असून चार मुलांचे वडील असल्याचे सरोज यांना ठाऊक नव्हते. सरोज यांना सोहनलाल यांच्या पहिल्या पत्नीविषयी 1963 मध्ये समजले होते. त्याचवर्षी सरोज यांचा मुलगा राजू खानचा जन्म झाला. 1965 मध्ये सरोज खान यांनी सोहनलाल यांच्या दुस-या बाळाला जन्म दिला. मात्र बाळाचा 8 महिन्यांत मृत्यू झाला होता. जेव्हा सोहनलाल यांनी सरोज यांच्या मुलाला आपले नाव देण्यास नकार दिला, तेव्हा सरोज त्यांच्यापासून विभक्त झाल्या. काही वर्षांनंतर सोहनलाल यांना हृद्यविकाराचा झटका आला. त्यांच्या आजारपणात सरोज पुन्हा त्यांच्या आयुष्यात परतल्या. याकाळात सरोज यांनी  मुलगी कुकुला जन्म दिला. मात्र मुलीच्या जन्मानंतर पुन्हा एकदा सोहनलाल आणि सरोज यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले आणि सरोज यांनी दोन्ही मुलांचे संगोपन एकटीने केले.  

 

सरोज खान यांच्या कॉन्ट्रोव्हर्शिअल लाइफ आणि त्यांच्या बॉलिवूड करिअरविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...