आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

33 वर्षांची झाली ईशा देओल, पाहा बालपणीपासून ते आतापर्यंतची निवडक छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून वडील धर्मेंद्रसोबत ईशा, उजवीकडे बहीण आहनासोबत (वरती), खाली ईशा)
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची थोरली मुलगी ईशा देओल 33 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 2 नोव्हेंबर 1981ला मुंबईमध्ये झाला. मुंबईच्या मीठीबाई कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतल्यानंतर ईशाने ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षण घेतले.
ईशा बालपणापासून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगत होती. 2002मध्ये 'कोई मेरे दिल से पूछे' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमासाठी ईशाला बेस्ट डेब्यू अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
त्यानंतर ईशाने 'मै ऐसा ही हू', ‘जस्ट मॅरिड’, ‘काल’, ‘नो एंट्री’, ‘दस’ आणि ‘युवा’सारख्या सिनेमांत काम केले. मात्र तिच्या करिअरचा आलेख कधीच उंचावला नाही. 2004मध्ये रिलीज झालेल्या 'धूम' सिनेमाच्या टायटल साँगमुळे ईशाने चांगलीच चर्चा एकवटली होती. हा तिचा अखेरचा यशस्वी सिनेमा होता.
सिनेमांत अपयश झेलल्यानंतर ईशाने अभिनयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि 2012मध्ये बिझनेसमन भरत तख्तानीसोबत लग्न केले. ईशा काही दिवसांपूर्वी एमटीव्हीच्या रिअॅलिटी शो 'रोडीज'मध्ये दिसली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ईशाच्या बालपणीपासून ते आतापर्यंतची निवडक छायाचित्रे...