आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : लाँच करणाऱ्या सुभाष घईंवर या अॅक्ट्रेसने लावला होता \'कास्टींग काऊच\'चा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुभाष घई दिग्दर्शित 'परदेस'ने रात्रीतून एका अनोळखी चेह-याला स्टार बनवले. ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री महिमा चौधरी आहे. महिमा आज 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. पहिल्याच सिनेमात बॉलिवूड स्टार शाहरुख खानसह काम करून लोकप्रियता मिळवली खरी पण या सिनेमाच्या यशाचा तिच्या करिअरला मात्र फारसा काही फायदा झाला नाही. आता तर तिच्या लूकमध्ये एवढा बदल झाला, की तिला ओळखणेही कठीण झाले.
 
महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी असल्याचे फार क्वचित लोकांना ठाऊक असावं. महिमाच्या करिअरला 20 वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षांत महिमाच्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले.
फ्लॉप करिअर, लग्नापूर्वीची प्रेग्नेंसी, लिएंडर पेससोबतचे अफेअर, सुभाष घईंवर लावलेला कास्टिंग काऊचचा आरोप... असे एक ना अनेक वाद महिमाच्या आयुष्याशी निगडीत आहेत. 

सुभाष घईंनी दिले महिमा हे नाव...
13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंगमध्ये महिमाचा जन्म झाला. महिमाने आपले मॉडेलिंग करिअर ऋतू चौधरी नावानेच सुरु केले होते. पण 'परदेस' सिनेमात सुभाष घईने तिला केवळ भूमिकाच दिली नाही, तर महिमा हे नवीन नावदेखील दिले. 'परदेस' सिनेमापूर्वी एका जाहिरातीत महिमा झळकली होती. या जाहिरातीत महिमाला पाहून सुभाष घई यांनी तिला 'परदेस'मध्ये संधी दिली होती.
 
पुढे वाचा, लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती महिमा...
लिएंडर पेससोबत होते अफेअर..
दुस-या लग्नाचा विचार केल्यानंतर घेणारेय घटस्फोट... यासह बरंच काही..

 
बातम्या आणखी आहेत...