आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: Family Members And Relatives Of Ajay Devgan

हा आहे अजय देवगणचा भाऊ, राणी मुखर्जी, मोहनीश बहलसुध्दा आहेत नातेवाईक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनिल देवगण वहीणी काजोलसोबत आणि डावीकडे अजय देवगण आणि राणी मुखर्जी)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आज 46 वर्षांचा झाला आहे. 2 एप्रिल 1969 रोजी त्याचा जन्म नवी दिल्लीमध्ये झाला. सिल्वर वीच हायस्कूल, जुहू आणि मुंबई कॉलेजमधून शिक्षण घेतले. 1991पासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या अजयने दिग्दर्शक संदेह कोहलीच्या 'फूल और काटे'मधून पदार्पण केले. अजयचे कुटुंबीय आणि नातेवाईकसुध्दा बॉलिवूडमध्ये काम करतात. त्याचे वडील वीरु देवगण बॉलिवूडचे प्रसिध्द स्टंट कोरिओग्राफर आहेत, आई वीणा देवगण सिनेमा निर्माती आहे.
अजयच्या धाकट्या भावाचे नाव अनिल देवगण आहे, तो सहायक दिग्दर्शक म्हणून काम करतो. त्याने 'राजू चाचा' आणि 'ब्लॅकमेल'सारख्या सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. अजय काजोलचा पती आहे, दोघांना दोन मुले (मुलगी न्यासा आणि मुलगा युग) आहेत. आजच्या नातेवाईकांविषयी सांगायचे झाले तर अजयची सासू अर्थातच काजोलची आई तनुजा गतकाळातील सुंदर अभिनेत्रींमध्ये सामील आहेत. काजोलची बहीण तनिषासुध्दा बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावत आहे. अजयचे सासरे अर्थातच काजोलचे वडील शोमू मुखर्जी निर्माते होते. एप्रिल 2008मध्ये त्यांचे निधन झाले.
राणी मुखर्जी आणि मोहनीश बहल आहेत नातेवाईक-
अजय देवगणचे बॉलिवूडमध्ये अनेत नातेवाईक आहेत. अजयचे मात्र सर्वाधिक नाते काजोलच्या माहेरकडून जुळते. राणी मुखर्जी काजोलची कजिन आहे. राणी काजोलचे काका राम मुखर्जी (काजोलच्या आजोबांचे मोठे भाऊ सुबोध मुखर्जी यांचा मुलगा) यांची मुलगी आहे. या नात्याने राणी अजयची मेव्हणी लागते. शिवाय मोहनीश बहल अजयचा मेव्हणा आणि काजोलचा चुलत भाऊ आहे. तो गतकाळातील अभिनेत्री नूतन यांचा मुलगा आहे आणि नूतन काजोलची आई तनुजा यांची थोरली बहीण आहेत.
काजोल यांच्या एक कजिनलासुध्दा खूप कमी लोक ओळखतात. तिचे नाव शरबनी मुखर्जी आहे. शरबनी बॉलिवूड आणि दक्षिणात्य अभिनेत्री आहे. ती काजोलचे काका रोनो मुखर्जी यांची मुलगी आहे . शिवाय अयान मुखर्जीसुध्दा अजयचा मेहुणा आहे. तो काजोलचे काका देब मुखर्जी यांचा मुलगा आहे. काजोलच्या वडिलांना पाच भाऊ (रोनो मुखर्जी, देब मुखर्जी, शोमू मुखर्जी आणि शुबीर मुखर्जी) आहेत. तिचे आजोबा शशधर मुखर्जी हिंदी सिनेसृष्टीचे प्रसिध्द निर्माते होते. 1930मध्ये बॉम्बे टॉकीजमधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. शिवाय फिल्मस्तान स्टुडिओचे संस्थापकाच्या रुपातसुध्दा त्यांना ओळखले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अजय देवगणच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांची छायाचित्रे...