आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... अजय देवगणमुळे अविवाहित राहिली ही अॅक्ट्रेस, एकेकाळी फेमस अॅक्टरसोबत होते अफेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस तब्बू 46 वर्षांची झाली आहे, मात्र अद्याप तिने लग्न केलेले नाही. 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असे आहे. 80 आणि 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाज तिची थोरली बहीण आहे. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत तब्बूने खुलासा करत सांगितले होते, की अभिनेता अजय देवगणमुळे तिचे आतापर्यंत लग्न होऊ शकले नाही. तिच्या सिंगल असण्याला अजय कारणीभूत आहे. अजय देवगण आणि तब्बू यांनी अलीकडेच रिलीज झालेल्या गोलमाल अगेन या चित्रपटा एकत्र काम केले आहे. 
 
सिंगल स्टेटसविषयी तब्बूने कोणता खुलासा केला.. 
- तब्बू म्हणाली होती, की ती अजय देवगणमुळे अद्याप अविवाहित आहे. 
- तब्बू म्हणाली, मी आणि अजय 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. अजय माझा कझिन समीर आर्यचा शेजारी आणि जवळचा मित्रही होता. मी जेव्हा छोटी होते, त्यावेळी समीर आणि अजय माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. मला एखाद्या मुलाशी बोलताना पाहिले की, ते त्या मुलाची धुलाई करायचे. दोघे त्यावेळी फार गुंडगिरी करायचे.
 
अजयवर सोपवली आहे मुलगा शोधण्याची जबाबदारी...
- रिपोर्ट्सनुसार अजयची खास मैत्रीण असलेल्या तब्बूचे लग्न व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्याबाबत तब्बू गंमतीत म्हणते की, मी अजयला नेहमी म्हणत असते की, माझ्यासाठी एखादा सुटेबल मुलगा शोध. 
- तब्बू म्हणाली, माझे आणि अजयचे नाते खूप चांगले आहे. सर्व मेल अॅक्टर्समध्ये माझ्यासाठी अजय सर्वात महत्त्वाचा आहे. तो अगदी लहान मुलांसारखा आणि खूप प्रोटेक्टीव्ह आहे.

अनेक चित्रपटांत तब्बू-अजयने केले एकत्र काम
- अजय आणि तब्बू यांनी 'विजयपथ' (1994), 'हकीकत' (1995), 'तक्षक' (1999) आणि 'दृश्यम' मध्ये एकत्र काम केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, एकेकाळी नागार्जुनसोबत होते अफेअर, पण होऊ शकले नाही लग्न...
बातम्या आणखी आहेत...