आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: कधीकाळी TV रिपोर्टर होती जॅकलीन, 2006मध्ये जिंकला मिस श्रीलंकाचा ताज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- जॅकलीन फर्नांडिस बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस 30 वर्षांची झाली आहे. 11 ऑगस्ट 1985 रोजी तिचा जन्म बहरीनमध्ये झाला. तिचे वडील श्रीलंकेचे तर आई मलेशियाची आहे. चार बहीण-भावंडांमध्ये जॅकलीन सर्वात लहान आहे. जॅकलीन बहरीनमध्ये लहानची-मोठी झाली असली, तरी तिचे कुटुंबीय श्रीलंकेत राहतात.
करिअरची सुरुवात-
जॅकलीनने पदवी शिक्षण घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियामधून जर्नालिझममध्ये मास्टर डिग्री घेतली. त्यानंतर जॅकलीनने आपले करिअर टीव्ही रिपोर्टर म्हणून सुरु केले. तिला बालपणापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न होते. एका श्रीलंकन जर्नलच्या सांगण्यानुसार, जॅकलीनने वयाच्या 8व्या वर्षीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. सांगितले जाते, की जर्नालिझममध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिला राजकिय पत्रकार होण्याची इच्छा होती. परंतु एकेदिवशी तिला मॉडेलिंगची ऑफर आली आणि तिने चटकन होकार दिला.
2006मध्ये बनली मिस श्रीलंका-
2006मध्ये जॅकलीनने मिस श्रीलंका स्पर्धेत सहभाग घेतला आणि ताज आपल्या डोक्यावर सजवला. हा तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर तिने आपले लक्ष मॉडेलिंगवर केंद्रित केले.
'अलादीन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री-
2009मध्ये जॅकलीनने दिग्दर्शक सुजॉय घोषच्या 'अलादीन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमात रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. मात्र जॅकलीनला स्टारडस्टच्या वतीने वेस्ट एक्साइटिंग फेसचा अवॉर्ड मिळाला. 'अलादीन'नंतर तिने 'जाने कहा से आई है', 'हाऊसफुल 2', 'मर्डर 2' 'किक' आणि 'बंगिस्तान' काम केले. जॅकलीनचा 'ब्रदर्स' हा आगामी सिनेमा लवकरच थिएटरमध्ये झळकणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि सिध्दार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जॅकलीनचे मॉडेलिंगपासून आतापर्यंतचे खास फोटो...