आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरे नाव आहे जॉन प्रकाशराव जनुमाला, जाणून घ्या कसे बनले \'जॉनी लीवर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर
मुंबई: जॉनी लिव्हर यांचे नाव घेताच कोण-कोणते विनोदी पात्र तुमच्या चटकन डोळ्यासमोर उभे राहतात? 'नरसिम्हा'मधील टँपू दादा, 'करण अर्जुन'मधील लिंगैया, 'राजा हिंदुस्तानी'मधील दिलदार सरदार बलवंत सिंह की 'नायक' सिनेमातील टीव्ही कॅमेरामन टोपीचे की नुकताच रिलीज झालेल्या 'एन्टरटेन्मेंट'मधील हबीबुला...कदाचित सर्वच आठवले असावेत. जॉनी असे व्यक्तीमत्व आहेत त्यांची रुपेरी पडद्यावरील उपस्थितीसुध्दा प्रेक्षकांना मनोरंजनात्मक वाटते. लोकांच्या चेह-यावर हसू उमटवणारा हाच विनोदवीर एकेकाळी पोट भरण्यासाठी रस्त्यावर पेन विकत होता.
90च्या दशकात हिंदी सिनेमामध्ये जॉनी लिव्हर यांनी अभिनय आणि कॉमेडीने सर्व बॉलिवूड इंडस्ट्रीला हसून लोटपोट केले. सिनेमातील काही किस्से त्यांच्यासाठी वेगळ्या पध्दतीने लिहण्यात येऊ लागले होते. त्यांच्या पात्राचे नावसुध्दा प्रेक्षकांचे मनोरंजन करतील असेच ठेवण्यात येत होते.
भारतीय सिनेमांमध्ये प्रसिध्द विनोदी अभिनेता जॉन लिव्हर 14 ऑगस्टला 58 वर्षांचे झाले आहे. याच दिवशी जॉनी यांचा 1957मध्ये आंध्रप्रदेशमध्ये जन्म झाला. आतापर्यंत त्यांना बेस्ट कॉमेडिअन श्रेणीमध्ये 13 फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकले आहेत. 1984मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या जॉनी यांनी आतापर्यंत 350 सिनेमांमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा जॉनी लिव्हर यांच्या जीवनाशी संबंधित काही अशाच रंजक गोष्टी...