आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: आतून असे दिसते जॉनी लीव्हरचे घर, या कारणामुळे सोडले होते 7वीत शिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 14 ऑगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशातील एका तेलुगु ख्रिश्चन कुटुंबात जॉनी लीव्हरचा जन्म झाला. आज जॉनी त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. जॉनी यांचे खरे नाव जॉन राव प्रकाश राव जनुमाला असे आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की, घरातील 
खराब आर्थिक परिस्थितीमुळे जॉनी यांनी सातवीतच शिक्षण सोडले. त्यांचे वडील हिन्दूस्तान लीव्हर लिमिटेडमध्ये काम करत असत. जॉनी हे घरातील सर्वात मोठे होते. त्यांना 3 बहिणी आणि 2 भाऊ होते. इतक्या मोठ्या घराचा खर्च एकट्या वडिलांना उचलणे शक्य नसल्यामुळे आणि घरातील मोठा मुलगा असल्यामुळे जॉनी यांनी शिक्षण सोडले आणि जॉब करण्यास सुरुवात केली. सध्या मुंबईत 3BHK अपार्टमेंटमध्ये राहतात जॉनी लीव्हर...
 
- अनेक वर्षाच्या स्ट्रगलनंतर जॉनी लीव्हर यांनी बॉलिवूडमध्ये त्यांची एक वेगळी ओळख बनवली आहे.
- सध्या जॉनी पत्नी सुजाता, मुगली जिमी आण मुलगा जेसी यांच्यासोबत अंधेरी (वेस्ट), मुंबई येथे 3BHK अपार्टमेंट मध्ये राहतात.
- असे म्हणतात की, जॉनी यांचा दुसरा फ्लॅटही आहे पण हा फ्लॅट त्यांच्यासाठी खास आहे. त्यांनी हा 1990 साली खरेदी केला होता. 
- काही दिवसांपूर्वी आमच्या प्रतिनीधीला दिेलेल्या मुलाखतीत जॉनी यांची मुलगी जेमीने सांगितले होते की, "वडिलांनी हा फ्लॅट 1990 साली त्यांच्या मेहनतीच्या कमाईने खरेदी केला होता. या घरासोबत त्यांच्या फार आठवणी आहेत आणि काहीही झाले तरी ते हा फ्लॅट सोडणार नाहीत. 
- माझ्या भावाचा जन्म झाल्यावर आम्ही या घरात शिफ्ट झालो होतो."
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, जॉनी लीवरच्या घराचे 10 INSIDE PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...