आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अशी दिसत होती कंगना रनोट, पाहा फॅमिलीसोबतचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना रनोट (पहिल्या फोटोमध्ये बालपणी आणि दुस-या फोटोमध्ये आता) - Divya Marathi
कंगना रनोट (पहिल्या फोटोमध्ये बालपणी आणि दुस-या फोटोमध्ये आता)
मुंबई: 23 मार्च 1987ला हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्याच्या जवळ स्थित सुरजपूरमध्ये (भाबंला) जन्मलेली कंगना रनोट 29 वर्षांची होईल. कंगना आपल्या बोल्ड भूमिका, स्पष्टवक्तपणा, अभिनयच्या कौशल्यासाठी किंवा खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत राहते.
कंगनाच्या जन्मामुळे नाराज होते कुटुंबीय...
यावर्षी महिला दिनानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने सांगितले, की तिच्या जन्मामुळे कुटुंबीय नाराज होते. मात्र, तिच्या थोरल्या बहिणीच्या जन्मामुळे सर्वजण आनंदी होते. परंतु दुसरा मुलगा होईल या विचारात असलेल्यांच्या घरात मुलगी जन्माला आली आणि कुटुंबीय नाराज झाले. त्यावेळी कंगनाला नको असलेले मुले मानले जात होते.
कंगनाची आवडती आहे तिची थोरली बहीण...
कंगनाचे वडील अमरदीप रनोट बिझनेसमन तर आई आशा रनोट शिक्षिका आहे. तसेच तिची थोरली बहीण रंगोली तिची फेव्हरेट आहे. रंगोली कंगनाची मॅनेजर आहे. अॅसिड अटॅकसारख्या भयानक घटनेला समोरी गेलेल्या रंगोलीच्या आयुष्यावर कंगनाला बायोपिक बनवायचे आहे. कंगनाला एक धाकटा भाऊसुध्दा आहे.
थिएटरमध्ये केले काम...
कंगनाच्या आई-वडिलांची इच्छा होती, की तिने डॉक्टर बनावे. परंतु नशीबाला काही वेगळेच मान्य होते. कंगनाने कमी वयातच मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली आणि दिल्लीमध्ये राहून प्रसिध्द थिएटर दिग्दर्शक अरविंद गौडकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. तिने अरविंदच्या थिएटर कार्यशाळा इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये भाग घेतला आणि अनेक नाटकांत काम केले. तिचे पहिले नाटक गिरीश कर्नाडचे 'रक्त कल्याण' होते.
फिल्मी करिअरमध्ये उतार चढाव...
2006मध्ये कंगनाने 'गँगस्टर' सिनेमातून अभिनयास सुरुवात केली. या सिनेमासाठी तिला उत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) फिल्मफेअर अवॉर्डने गौरवण्यात आले. सिनेमाच्या यशानंतर तिला बॉलिवूडमध्ये मीना कुमारीप्रमाणे ट्रेजडी क्वीन म्हटले जाऊ लागले. शिवाय कंगनाने 'फॅशन', 'वो लम्हे', 'लाइफ इन मेट्रो', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'तनु वेड्स मनु'सारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले. मात्र तिचे 'रिवॉल्वर रानी', 'नो प्रोब्लम', 'नॉक आउट', 'आई लव एन वाय', 'कट्टी-बट्टी' हे सिनेमे फ्लॉप ठरले. 2014मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्वीन' आणि 'तनु वेड्स मनु' या सिनेमांत आपल्या शानदार अभिनयाने कंगनाने प्रेक्षकांना प्राभावित केले. यादोन सिनेमांसाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कर मिळाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कंगना रनोटच्या बालपणीचे आणि कुटुंबीयांसोबतचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...