आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस युनिव्हर्स ते महेश भूपतीची पत्नी बनण्यापर्यंत, पाहा लारा दत्ताचे खास PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगी सायरा आणि पती महेश भूपतीसोबत लारा दत्ता)

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. लारा दत्ता बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. 2000मझ्ये मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करणा-या लाराने 2003 मध्ये 'अंदाज' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2011मध्ये तिने टेनिसपटू महेश भूपतीसोबत लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगी असून सायरा असे तिचे नाव आहे.
लारा दत्ताचे खासगी आयुष्य
लारा दत्ताचा जन्म 16 एप्रिल 1978 रोजी गाजियाबाद (उत्तर प्रदेश) येथे झाला. तिचे वडील हिंदू आणि आई एंग्लो इंडियन आहे. 1981मध्ये लाराचे कुटुंब बंगळूरू येथे स्थायिक झाले. येथे सेंट फ्रांसिस झेव्हिअर गर्ल्स स्कूलमध्ये लाराने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले.
मिस युनिव्हर्सचा जिंकला किताब
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर लारा फॅशन जगताकडे वळली. फॅशन वर्ल्डमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची तिची इच्छा होती. तिने आपली ही इच्छा पूर्णदेखील केली. तिने सर्वात प्रथम ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेलचा खिताब आपल्या नावी केला. त्यानंतर लारा फेमिना मिस इंडिया आणि त्यानंतर मिस युनिव्हर्स झाली. मिस युनिव्हर्सचा खिताब आपल्या नावी करणारी लारा दुसरी भारतीय महिला आहे.
बॉलिवूडमध्ये लाराची एन्ट्री
2000मध्ये मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यानंतर लाराने 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 'अंदाज' हा तिचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी लाराने सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला.
'अंदाज'नंतर लारा दत्ताने अनेक सिनेमे केले, त्यापैकी काही सिनेमा हिट ठरले. लाराच्या हिट सिनेमांमध्ये 'मस्ती', 'नो एन्ट्री', 'पार्टनर', 'हाऊसफूल', 'ब्लू'सह आणखी काही सिनेमांचा समावेश आहे.
सिनेमांपेक्षा ग्लॅमरस अंदाजासाठी विशेष चर्चा
लारा दत्ता आपल्या सिनेमांपेक्षा फॅशन आणि लूकमुळे चर्चेत राहिली. 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'डेविड' या सिनेमात लारा झळकली होती. त्यानंतर ती अद्याप मोठ्या पडद्यावर आली नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.
टेनिस प्लेअर महेश भूपतीसह लग्न
2010मध्ये लारा दत्ता आणि टेनिस प्लेअर महेश भूपती यांच्यात सूत जुळले. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2011 रोजी लाराने महेश भूपतीसोबत लग्न केले. लारा-महेशला दोन वर्षांची एक मुलगी आहे. तिचे नाव सायरा आहे.
लग्नानंतर लाराने बॉलिवूडपासून लांब राहणे पसंत केले. लग्नानंतर ती केवळ तीनच सिनेमांमध्ये झळकली. ‘चलो दिल्ली’ (2011), ‘डॉन 2’ (गेस्ट अपिअरेंस) (2011) आणि 'डेविड' (2013) या सिनेमांमध्ये ती झळकली होती. 'नो एन्ट्री में एन्ट्री' हा तिचा आगामी सिनेमा आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा लाराची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची निवडक खास छायाचित्रे...