आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता दीदींनी का केले नाही लग्न, जाणून घ्या कारण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लता मंगेशकर घरी गाण्यांची सीडी पाहताना)
मुंबई- भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आज (28 सप्टेंबर) वाढदिवस आहे. यावेळी divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी. लता यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929ला एका माध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मध्यप्रदेशच्या इंदोर शहरात जन्मलेल्या लता पंडित दीनानाथ मंगेशकर यांची थोरली मुलगी आहेत. त्यांचे वडील रंगमंचाचे कलाकार आणि गायक होते.
पहिले गाणे गायल्यावर मिळाले होते 25 रुपये-
लता यांना पहिल्यांदा स्टेजवर गाणे गाण्यासाठी 25 रुपये मिळाले होते. याला त्या पहिली कमाई मानतात. लताजी यांनी पहिल्यांदाच 1942मध्ये मराठी सिनेमा 'पहिली मंगळागौर'साठी गाणे गायले होते. लता यांचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि आशा भोसले यांनी सर्वांनी संगीत क्षेत्राचीच निवड केली आहे.
का नाही केले लग्न?
लता मंगेशकर यांनी लग्ना का केले नाही. याचे उत्तर त्या स्वत: देतात. लता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की घरात सर्व सदस्यांची जबाबदारी माझ्यावर होती. अशावेळी अनेकदा लग्नाचा विचार मनात आला मात्र तो प्रत्यक्षात कधीच अमलात आणला नाही. खूप कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली होती. 1942मध्ये वयाच्या 13व्या वर्षी लताजी यांच्या डोक्यावरून वडिलांची सावली हरपली. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली.
सिनेमांत छोट्या-छोट्या भूमिका कराव्या लागल्या-
लता मंगेशकर यांचे वडील शास्त्रीय संगीताचे खूप मोठे प्रशंसक होते, म्हणून कदाचित ते लताजी यांच्या गायनाच्या विरोधात होते. 1942मध्ये त्यांच्या वडीलाचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची अर्थित स्थित ढासळली आणि लता यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांत छोट्या-छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लता यांचे निवडक फोटो...