आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: 45 वर्षांची झाली मंदिरा बेदी, पाहा तिचे ग्लॅमरस PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री, मॉडेल, फॅशन डिझाइनर आणि टीव्ही प्रेजेंटर मंदिरा बेदी आज (15 एप्रिल) 43 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी कोलकातामध्ये झाला. मंदिराच्या वडिलांचे नाव वीरेंद्र सिंह बेदी आणि आईचे गीता बेदी आहे. तिला 90च्या दशकातील 'शांती' मालिकेसाठी विशेष ओळखले जाते. या कौंटुबीक शोमध्ये मंदिराने 'शांती' नावाच्या तरुणीचे पात्र साकारले होते. ती आपल्या हक्काची लढाई लढताना दिसते. या शोमधून मंदिरा घरा-घरात पोहोचली पोहोचली होती, तिची 'शांती' म्हणून ओळख पडली होती. त्यानंतर मंदिराने 'औरत' आणि 'क्योकी सास भी कभी बहू थी'सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले.
 
 
आयपीएल कव्हरेजही केले आहे-
'शांती'मध्ये ग्लॅमर आणि झगमग जगापासून दूर राहिलेली मंदिरा बेदी आज आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अवतारासाठी प्रसिध्द आहे. तिने अँकर म्हणून आयपीएल सीजन-3सुध्दा कव्हरेज केले होते. त्यादरम्यान तिने परिधान केलेली साडी खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तिने स्वत:चे एक साडी स्टोअरसुध्दा चालू केले होते.
 
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी अडकली लग्नगाठीत-
मंदिराने प्रेमाच्या दिवशी अर्थातच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लग्न केले होते. 14 फेब्रुवारी 1999 रोजी तिने निर्माता राज कौशलसोबत सप्तपदी घेतल्या. दोघांना वीरा नावाचा एक मुलगा आहे, त्याचा जन्म 19 जून 2011 रोजी झाला.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून  मंदिरा बेदीचे खास PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...