Home »Gossip» Birthday Special Meet Bachchan Family Members Who Are Not Well Known

Family Members : बिग बींची मेहुणी आहे अभिनेत्री, भेटा त्यांच्या सासूबाई, मुली आणि जावयांना

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 00:43 AM IST

मुंबईः 11 ऑक्टोबर रोजी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आपला 75 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. बच्चन कुटुंबाचा उल्लेख होताच, अमिताभ-जया आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची नावे समोर येतात. मात्र या चौघांव्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील अनेक सदस्यांना सामान्य लोक ओळखत नाहीत.

बच्चन कुटुंब हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कुटुंब आहे. अमिताभ यांना एक धाकटे बंधू असून त्यांचे नाव अजिताभ बच्चन आहे. अजिताभ आपल्या कुटुंबासह लंडनला स्थायिक झाले आहेत. अजिताभ यांच्या पत्नीचे नाव रमोला असून या दाम्पत्याला एकुण चार (मुलगा भीम, तीन मुली- नीलिमा, नम्रता, नैना) मुले आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अजिताभ यांची मुलगी नैना बच्चन बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरसोबत लग्नगाठीत अडकली. अमिताभ बच्चन यांच्या सासूबाई इंदिरा भादुडी भोपाळमध्ये वास्तव्याला आहेत. तर त्यांची मेव्हणी हिंदी टीव्ही आणि सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर साडभाऊसुद्धा प्रसिद्ध अभिनेते आहेत.

बच्चन कुटुंब बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीसुद्धा देशातील चर्चित कुटुंब राहिले आहे. अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन प्रसिद्ध कवी होते. त्यांचा आई तेजी बच्चन आणि इंदिरा गांधी यांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.
बिग बींचा वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांची ओळख करुन देत आहोत...

Next Article

Recommended