आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 वर्षांचा झाला मिका सिंग, बोल्ड गाणी आणि राखीला KISS करुन एकवटली चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः मिका सिंग, उजवीकडे - राखी सावंतला किस करताना)
मुंबईः 'शेक दैट बूटी..', 'ए गणपत...चल दारू ला', 'बिट्टू सबकी लेगा रे...', 'इश्क की मां की', 'सारी दुनिया मेरे इस पे' यांसारख्या कॉन्ट्रोव्हर्शिअल गाण्यांना स्वरबद्ध करुन आपला बिनधास्तपणा दाखवणारा आणि 'इब्ने-बतूता', 'ढिंका चिका', 'बन गया कुत्ता' आणि 'दिल में बजी गिटार' यांसारख्या गाण्यांना आपला अन-कन्वेंशनल आवाज देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेणारा गायक मिका सिंग आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. मिका सिंग इंडस्ट्रीतील अशा गायकांपैकी एक आहे, ज्याचे एक गाणे सिनेमाच्या यशाला मोठा हातभार लावत असते.
मस्तमौला अंदाज, अन-कन्वेंशनल आवाज आणि वादविवादांशी जुने नाते, हीच कदाचित मिकाची खरी ओळख आहे. मिका कितीही वादात अडकला असला तरी त्याची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही.
10 जून 1977 रोजी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे जन्मलेल्या मिकाचे खरे नाव अमरीक सिंह आहे. मात्र बॉलिवूडमध्ये मिका या नावाने तो प्रसिद्ध आहे. मिका प्रसिद्ध गायक दलेर मेंहदीचा धाकटा भाऊ आहे.
आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत मिकाने इंडस्ट्रीत गायक म्हणून स्वतःची वेगळी ओळख नर्माण केली. बॉलिवूडमध्ये आज कॉन्ट्रोव्हर्सी किंग मिका सिंगला मोठी मागणी आहे. एका काळ असा होता, जेव्हा लोक त्याचे तोंड बघणेही पसंत करत नव्हते. मात्र मिकाने आपल्या आवाजाच्या बळावर स्वतःची ही इमेज पुसून काढली.
एकेकाळी इंडस्ट्रीत करावा लागला होता स्ट्रगल
मिका सिंग आपल्या भावाच्या बँडमध्ये गिटारिस्ट म्हणून काम सुरु केले होते. मिकाने दलेर यांच्यासाठी 'डर दी रब रब कर दी' हे गाणे कंपोज केले होते. त्यानंतर त्याने स्वतः पार्श्वगायन करण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा मिका रेकॉर्डिंग स्टुडिओत जायचा तेव्हा दलेर मेंहदीच्या नावावर संगीतकार, दिग्दर्शक त्याचे गाणे ऐकायला तयार तर व्हायचे, मात्र दुस-याच क्षणी त्याचा अन-कन्वेंशनल आवाज ऐकून त्याला रिजेक्ट करायचेय
मिकाला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. प्रत्येक ठिकाणी निराश झाल्यानंतर मिकाने स्वतःचा अल्बम काढण्याचा निर्मय़ घेतला. अल्बममधील 'सावन में लग गई आग' हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतंय. त्यानंतर मिकाने आपल्या याच अन-कन्वेंशनल आवाजाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
मिका आणि राखी सावंत वाद
मिका आणि वादाचे तसे जुनेच नाते आहेत. कधी को-स्टारला किस करने असो वा छेडछाड यामुळे तो वादात अडकला आहे. 2006 मध्ये आयटम गर्ल राखी सावंतला मिकाने आपल्याच बर्थडे पार्टीत सर्वांसमोर किस केले होते. त्याच्या या लिपलॉकमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. या कारणामुळे राखी न्यायलयातसुद्धा गेली होती. अनेक दिवस हे प्रकरण मीडियात गाजले.
इतकेच नाही तर 'इस जंगल से मुझे बचाओ' या शोदरम्यान मिकाने अभिनेत्री आणि मॉडेल निगार खानलासुद्धा किस करुन वादाला तोंड फोडले होते. मिकाला लोकांनी माफी मागण्यास सांगितले होते, कारण त्याने टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये असे लाजिरवाणे कृत्य केले होते. मात्र मिकाला आपल्या वागण्यावर मुळीच पश्चाताप झाला नाही. विशेष म्हणजे मिकाने राखीची खिल्ली उडवण्यासाठी एक गाणेसुद्धा तयार केले होते. त्याचे शब्द होते, ऐ भाई तूने पप्पी क्यों ली'
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, मिका सिंगशी निगडीत आणखी काही वाद...