आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special! Bong Beauty Nandana Sen Is Undoubtedly A Bombshell

Birthday special! ही ग्लॅमरस अभिनेत्री झाली 48 वर्षांची, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांची आहे कन्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री नंदना सेन हिचा आज वाढदिवस आहे. नंदनाने वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत. ही नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि समकालीन बंगाली साहित्य लेखिका पद्मश्री नबनिता देव सेन यांनी कन्या आहे. नंदनाचा जन्म 19 ऑगस्ट 1970 रोजी कोलकाता शहरात झाला होता. भारत, यूरोप आणि अमेरिकेतील विविध शहरात नंदनाचे शिक्षण झाले. नंदना सेन हिने 'दी डॉल' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये 'ब्लॅक'मधून झळकली. त्यात तिने रानी मुखर्जीच्या 17 वर्षीय बहिणीची भूमिका साकारली होती.

2008 मध्ये नंदना ब्रिटिश टेलीव्हिजन श्रृंखला शार्पमधील 'शार्प्स पेरिल'मध्ये दिसली होती. नंदना सेन हिचे तीन वर्षांपूर्वी ब्रेकअप झाले होते. 'गजिनी' चित्रपटाचे निर्माता मधु मन्तेना यांच्यासोबत ती गेल्या नऊ वर्षांपासून रि‍लेशनशि‍प होती. त्यानंतर नंदनाने त्याचवर्षी 22 जूनला पेंग्विन पब्लिकेशनचे सीईओ जॉन मेकिनसन यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये विवाह केला होता. या विवाह समारंभात मोजक्याच जवळच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.
उल्लेखनीय म्हणजे नंदनाने तिच्या विवाहात मधु मन्तेना यांनाही आमंत्रित केले होते. परंतु ते या कार्यक्रमात दिसले नाही. जॉन यांचे वय पन्नासच्या जवळपास असून त्यांचा पगार 15 लाख 75 हजार पौंड आहे.
जॉन आणि नंदना सेन यांची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांची जवळीकता वाढली होती. नंदनाने अनेक हिंदी, इंग्रेजी आणि बंगाली भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात ब्लॅक, रंग रसिया, स्ट्रेंजर, दी फॉरेस्ट यांचा समावेश आहे. दिग्दर्शक केतन मेहता यांच्या चित्रपटात नंदना सेन हिने एक टॉपलेस दृश्य दिले होते. अभिनेत्री नंदना सेन हिने 'रंग रसिया'मध्येही बोल्ड दृश्ये दिले होते.
वयाची 48 वर्षे पूर्ण केल्यानंतरही नंदना सेन पूर्वीएवढीच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या अभिनेत्रीच्या बोल्डनेसची झलक...