आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: दोन मुलींचा वडील आहे चंकी पांडे, मुंबईत पत्नीलसोबत चालवतो रेस्तरॉ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चंकी पांडे, त्याची पत्नी भावना, मुलगी रयासा आणि अनन्या)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे (खरे नाव सुयश शरद पांडे) 53 वर्षाचा झाला आहे. 26 सप्टेंबर 1962ला जन्मलेल्या चंकीने 1987मध्ये पहलाज निहलानी यांच्या 'आग ही आग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि त्याच्या करिअरसाठी इंडस्ट्रीचे मार्ग मोकळे झाले. त्यानंतर त्याने 'पाप की दुनिया' (1988), 'खतरो के खिलाडी' (1988), 'जहरीले' (1990) आणि 'आँखे' (1992)सारख्या अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले.
1988मध्ये रिलीज झालेल्या सुपरहिट 'तेजाब' सिनेमात त्याने अनिल कपूरच्या मित्राची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअर उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. सिनेमांसोबतच, तो मुंबईमध्ये पत्नी भावनासोबत एक हेल्थ फूड रेस्तरॉसुध्दा चालवतो. शिवाय बॉलिवूड इलेक्ट्रिक नावाची त्याची एक मॅनेजमेंट कंपनीसुध्दा आहे, ही कंपनी स्टेज शोसाठी ओळखली जाते.
दोन मुलींचा वडील आहे चंकी-
चंकी पांडे सध्या मुंबई राहतो. त्याची आई डॉ. स्नेहलता पांडे प्रसिध्द डायटोलॉग आहे तर वडील डॉ. शरद पांडे प्रसिध्द हार्ट स्पेशालिस्ट आहेत. 1988मध्ये त्यांनी भावना पांडेसोबत लग्न केले. चंकी आणि भावना यांना दोन मुली आहेत. अनन्याचे वय 16 वर्षे तर दुसरी मुलगी रयासा 11 वर्षांची झाली आहे. दोन्ही मुली सध्या शिक्षण घेत आहेत. चंकीला एक भाऊसुध्दा आहे, त्याचे नाव चिक्की पांडे (खरे नाव अलोक शरद पांडे) आहे. चिक्की बिझनेसमन आहे.
निराश होऊन बांग्लादेशच्या सिनेमांशी जुळला-
90च्या दशक चंकीसाठी काही खास नव्हते. यादरम्यान रोमँटिक हीरोमध्ये सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खानसारखे सुपरस्टार सामील होते. अक्षय कुमार, अजय देवगण आणि सुनील शेट्टीसारखे हीरो अॅक्शन हीरोच्या रुपात ओळखले जाऊ लागले होते. या श्रेणीत स्वत: बसवणे चंकीसाठी कठिण होते. यावेळी दिग्दर्शक त्यांना हीरोचा भाऊ किंवा इतर सहायक भूमिका ऑफर करायला लागले होते. यामुळे वैतागलेल्या चंकीने बांग्लादेश सिनेमांकडे मोर्चा वळवला. चंकीला बांगाली भाषा येत नव्हती. म्हणून त्याचा आवाज डब केल्या जात होता. तिथे त्याने 'Swami Keno Asami', 'Besh Korechi Prem Korechi' आणि 'Meyera a Manush'सारखे हिट सिनेमे दिले आहेत.
2003मध्ये बॉलिवूडमध्ये पुनरागमन-
2003मध्ये चंकीने 'कयामत: सिटी अंडर थ्रीट' आणि 'एलान'सारख्या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. तेव्हापासून आतापर्यंत 'ओम शांती ओम', 'पेइंग गेस्ट', 'हाऊसफुल', 'हाऊसफुल 2' आणि 'बुलेट राजा'सारखे अनेक सिनेमांत काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चंकी यांचे कुटुंबीयांसोबतची काही छायाचित्रे...