आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथच्या प्रत्येक दुस-या सिनेमात असतो हा अॅक्टर, एका सिनेमासाठी घेतो 1 कोटींचे मानधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः फिल्मी दुनियेत अनेक कलावंत असे आहेत, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात छोटी भूमिका साकरुन केली. मात्र आज ते या इंडस्ट्रीत यशोशिखरावर पोहोचले आहेत. असेच एक कलावंत म्हणजे प्रसिद्ध विनोदवीर ब्रह्मानंदम. त्यांनी नुकतीच वयाची 61 वर्षे पूर्ण केली आहेत. आंध्रप्रदेशच्या साटेनापल्ली जिल्ह्यातील मुपल्ला गावात 1 फेब्रुवारी 1956 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात ब्रह्मानंदमच एकमेव एम. ए पर्यंत शिकलेले सदस्य होते. त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण घेतल्यानंतर अत्तिल्ली कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. कॉलेजमध्ये ते नेहमी विद्यार्थ्यांना मिमिक्री करुन हसवायचे.
 
ब्रह्मानंदम असे एक अभिनेते आहेत, जे साऊथच्या प्रत्येक दुस-या सिनेमात दिसतात. प्रत्येक अभिनेता आणि दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतो. ब्रह्मानंदम यांनी सांगितले, की एकदा त्यांच्या मित्राने त्यांचे नाव ब्रह्मानंदम हे कसे पडले याविषयी त्यांना विचारणा केली. माझ्या वडिलांनीसुद्धा या नावाचा अर्थ मला सांगितला नव्हता. मग मी नावाचा अर्थ शोधून काढला. तेव्हा मला समजले, की माझ्या नावचा अर्थ (द हॅपीनेस ऑफ द यूनिवर्स) म्हणजेच ब्रम्हांडचा आनंद असा होतो. 

प्रत्येक सिनेमांसाठी घेतात 1 कोटी...
ब्रह्मानंदम यांनी जुलै 2015मध्ये मानधन वाढवून 1 कोटी केले आहे. आता ते प्रत्येक सिनेमासाठी 1 कोटी रुपये मानधन घेतात. त्यांनी हा निर्णय आपल्या लोकप्रियतेमुळे घेतला. एखाद्या कॉमेडिअनला एवढे मानधन मिळणे मोठी गोष्ट आहे. 

पुढे वाचा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना हसवायचे ब्रह्मानंदम आणि बरंच काही... 
बातम्या आणखी आहेत...