आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HPY B'day Smita : निखळ सौंदर्याची राणी होती स्मिता, PHOTOS मधून पाहा झलक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मिता पाटील.. हे नाव जरी ऐकलं तरी लाखो चाहत्यांच्या मनाला एक प्रकारची रुखरुख लागून राहते. चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवून लाखो चाहत्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणाऱ्या स्मिताने वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. स्मिता जर आज आपल्यात असत्या तर त्यांनी 62 वा वाढदिवस साजरा केला असता. 
 
मृत्यूनंतर स्मिताचे तब्बल 14 सिनेमे रिलीज झाले होते. यावरूनच स्मिता त्याकाळी किती लोकप्रिय असेल याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे त्या काळी सौंदर्याची व्याख्या ठरलेला गोरा रंग स्मिताकडे नव्हता. मात्र तिला कधी त्याची गरजही नव्हती. हिंदीबरोबरच अनेक मराठी चित्रपटातही स्मिताने ठसा उमटवणाऱ्या भूमिका अमर केल्या. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील चाहते आजही स्मिता पाटील यांच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे वेडे आहेत असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. चला तर मग पाहुयात स्मिताच्या या अस्खलित सौंदर्याची एक झलक.

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्मिता पाटीलचे सौंदर्य दाखवणारे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...