आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: Sangeeta Bijlani Personal Life

सलमानसोबत छापल्या होत्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका, मात्र अजहरशी केले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री संगीता बिजलानी माजी क्रिकेटर मोहम्मद अजारुद्दीन आणि अभिनेता सलमान खान
मुंबई: 90च्या दशकात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री संगीता बिजलानीचा आज 55वा वाढदिवस आहे. संगीताची आणखी एक ओळख म्हणेज माजी मिस इंडियासुध्दा आहे. तिने वयाच्या 20व्या वर्षी 1980मध्ये भारतीय सौंदर्यवतीचा किताब आपल्या नावी केला होता. संगीताची आणखी एक मोठा ओळख म्हणजे ती माजी क्रिकेटर मोहम्मद अजरुद्दीदनची पत्नी आहे. मात्र, 2010मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
संगीताचा जन्म 9 जुलै 1960ला मुंबई येथे एका सिंधी कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव मोतिलाल होते. संगीताला बालणापासूनच ग्लॅमर वर्ल्डमध्ये रुची होती. 1988मध्ये तिने करिअरला सुरूवात केली.

'कातिल' हा तिच्या करिअरचा पहिला सिनेमा आहे. 1989मध्ये जे पी दत्ता यांच्या 'हथियार' हा ब्लॉकब्लस्टर सिनेमा तिच्या पदरी यश घेऊन आला.या सिनेमात सुरूवातीला डिंपल कपाडिया परंतु 'बंटवारा'मुळे तिने हा सिनेमा सोडून दिला. त्यानंतर 'त्रिवेदी', 'जुर्म', 'इज्जत', 'युगांधर', 'योध्दा', 'खून का कर्ज'सारख्या सिनेमांमध्ये ती झळकली.

मोठ्या पडद्यावरसह तिने छोट्या पडद्यावरील 'रंगोली' या शोसाठी काम केले. त्यानंतर तिने टीव्ही मालिक 'चांदनी'मध्येसुध्दा काम केले.

सलमानसह होते अफेअर
सलमान खान आणि संगीता बिजलानी एकेकाळी गंभीर नात्यात होते. दोघांचे नाते लग्नाच्या जवळपास पोहोचले होते. मात्र, सलमानच्या आयुष्यात सोमा अलीने एंट्री केली. त्यानंतर संगीता आणि सलमान यांच्यात दुरावा वाढला. सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते, की दोघांच्या लग्नाचे लग्नपत्रिकासुध्दा छापल्या होत्या.

अजहरुद्दीनसह केले लग्न
अजहरसोबत संगीताची भेट 90च्या दशकाच्या सुरूवातीला एक जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली. त्यानंतर भेटीचा सिलसिला पुढे वाढत गेला आणि दोघां 1996मध्ये लग्न केले. संगीतासाठी अजहरने पहिली पत्नी नौरानीला घटस्फोट दिला. आजहर-संगीता यांचे नाते 14 वर्षे टिकले. मात्र, 2010मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा संगीताची सलमान खानसोबत आणि खासगी आयुष्यातील निवडक छायाचित्रे...