आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: 'Sholay' Director Ramesh Sippy With His Wife

69 वर्षांचे झाले 'शोले'चे दिग्दर्शक, पाहा पत्नीसोबतचे निवडक PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: रमेश शिप्पी, किरण जुनेजा - Divya Marathi
फाइल फोटो: रमेश शिप्पी, किरण जुनेजा
मुंबई- दिग्दर्शक-निर्माते रमेश सिप्पी यांनी आतापर्यंत अनेक सिनेमे बॉलिवूडला दिले. परंतु त्यांना जी ओळख 'शोले'ने दिली ती कोणताच सिनेमा देऊ शकला नाही. केवळ एक सिनेमाच त्यांच्या करिअरला मैला दगड ठरला आणि अनेक रेकॉर्ड्ससह त्यांचे नाव इतिहासात महान दिग्दर्शक म्हणून सामील झाले. रमेश सिप्पी यांच्या 69व्या (23 जानेवारी 1947) वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूया त्यांच्या आयुष्यावर...
वडिलसुध्दा होते निर्माता...
रमेश सिप्पी यांचे वडील जी.पी. सिप्पी प्रख्यात निर्माते होते. वयाच्या नवव्या वर्षी रमेश सिप्पी
यांनी पहिल्यांदा कॅमे-यासमोर काम केले होते. 1953 मध्ये वडिलांच्या 'शहंशाह' या सिनेमात रमेश यांनी बालकलाकाराच्या रुपात काम केले होते. रमेश यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश प्राप्त झाले. 1971 मध्ये 'अंदाज' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी सात वर्षे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
दिले अनेक सुपरहिट सिनेमे...
दिग्दर्शक म्हणूनः अंदाज (1971), सीता और गीता (1972), शोले (1975), शान (1980), शक्ति (1982), सागर (1985), जमीन (1987), भ्रष्टाचार (1989), जमाना दीवाना (1995), टीव्ही मालिका- बुनियाद.
निर्माता म्हणूनः ब्रह्मचारी (1968), कुछ ना कहो (2003), ब्लफमास्टर (2005), टॅक्सी नंबर 9211(2006), चांदनी चौक टू चाइना (2009), नौटंकी साला (2013), सोनाली केबल (2013).
रमेश सिप्पी यांचे कुटुंब
अभिनेत्री किरण जुनेजा रमेश सिप्पी यांच्या दुस-या पत्नी आहेत. त्यांच्या लग्नाला 24 वर्षे झाली आहेत. रमेश सिप्पी यांना दोन मुले असून रोहन सिप्पी हे मुलाचे तर शीना सिप्पी हे मुलीचे नाव आहे. शीनाचे लग्न शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरसोबत झाले आहे. रोहन प्रसिद्ध दिग्दर्शक असून आपल्या वडिलांचा वारसा सांभाळत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रमेश सिप्पी यांचे पत्नीसोबतचे फोटो...