आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Spl: Singer Shaan With His Beautifull Wife Radhika

B\'day: 43 वर्षांचा झाला शान, पाहा पत्नी आणि मुलांसोबतचे निवडक Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पत्नी राधिका आणि मुलगा सोहम-शुभसोबत शान)
बॉलिवूडचा प्रसिध्द गायक शान आज (30 सप्टेंबर) 43वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 30 सप्टेंबर 1972ला मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये झाला. 1989मध्ये वयाच्या 17व्या वर्षी करिअर सुरु करणारा शान हिंदीसह बंगाली, उर्दू आणि कन्नडी भाषेतसुध्दा गातो. सिंगिंगशिवाय त्याने 'सारेगामापा', 'सारेगामापा- लिटिल चॅम्प्स', 'स्टार वॉइस ऑफ इंडिया'सारख्या म्यूझिक रिअॅलिटी शोसुध्दा केले आहेत.
म्यूझिक फॅमिलीमधून आहे शान-
शानचे वडील दिवंगत मानस मुखर्जी संगीतकार होते. तसेच शानची बहीण सागारिकासुध्दा बॉलिवूड गायिका आहे. शान 13 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याची आई मानसी मुखर्जी यांनी गायिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि कुटुंबाची जबाबदारी उचलली.
शानने 2000मध्ये राधिकासोबत लग्न केले, त्याला सोहम आणि शुभ ही दोन मुले आहेत.
जिंगल्समधून केली करिअरची सुरुवात-
शान बालपणी जाहिरातींसाठी गात होता. त्यानंतर त्याने रि-मिक्स गाण्यांना आवाज देण्यास सुरुवात केली. आर डी बर्मन यांच्या 'रुप तेरा मस्ताना...' गाण्याचे रि-मिक्स गायल्यानंतर शान लाइमलाइटमध्ये आला. 2000मध्ये 'तन्हा दिल' या अल्बमसाठी शानला एमटीव्ही एशिया म्यूझिकचा बेस्ट सोलो अल्बम अवॉर्ड मिळाला होता. शानने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांच्या गाण्यांना आवाज दिला आहे. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, हृतिक रोशनपासून शाहिद कपूर आणि रणबीर कपूरसारख्या अनेक अभिनेत्यांना शानने आवाज दिला आहे. शानला 5वेळा उत्कृष्ट गायक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
सिनेमातही केले काम-
शानने 2014मध्ये 'बलविंदर सिंह फेमस हो या' बॉलिवूड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शानचे कुटुंबीयांसोबतचे काही फोटो...