आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special: Sneak Peek Into The Life Of Boman Irani’S Sweet Little Parsi Family!

B\'day Spl: आई, पत्नी, दोन मुले, सून आणि नातू अशी आहे बोमन यांची स्वीट लिटील पारसी फॅमिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी जेनोबिया, मुले कियोज आणि दानेश आणि नातवासोबत बोमन इराणी - Divya Marathi
पत्नी जेनोबिया, मुले कियोज आणि दानेश आणि नातवासोबत बोमन इराणी

अभिनेते बोमन इराणी आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ते इंडस्ट्रीतील असे एक अभिनेते आहेत, ज्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत आपल्या करिअरला सुरुवात केली. बालपणापासूनच अभिनयात रुची असलेल्या बोमन यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर वेटर आणि हॉटेल स्टाफची नोकरी केली होती.

 

वेटर, फोटोग्राफर आणि अभिनेत्यापर्यंतचा प्रवास... 

बोमन इराणी यांचा जन्म 2 डिसेंबर 1959 रोजी झाला. मुंबईतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करुन त्यांनी प्रसिद्ध ताज महल पॅलेस अँड टॉवरमध्ये वेटर आणि रुम सर्व्हिस म्हणून नोकरी सुरु केली होती. काही वर्षांनी नोकरी सोडून त्यांनी आपल्या आईला बेकरी सांभाळण्यात मदत केली. 1987मध्ये त्यांनी फोटोग्राफीला सुरुवात केली. याच काळात बोमन यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. 1981 ते 1983 याकाळात त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले.

 

अभिनयाला सुरुवात...

2000 मध्ये राहुल बोस दिग्दर्शित 'एव्हरीवन सेज आय एम फाइन' या सिनेमात त्यांनी पहिली संधी मिळाली. अभिनेता म्हणून 2003 मध्ये रिलीज झालेला 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा त्यांचा पहिला हिट सिनेमा होता. त्यांनतर त्यांनी अनेक अविस्मरणीय सिनेमांत काम केले.

बोमन इराणी यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर संपूर्ण जगात नाव कमावले.

 

अशी आहे स्वीट लिटिल पारसी फॅमिली..

या अभिनेत्याच्या कुटुंबाविषयी त्यांच्या चाहत्यांना फारसे काही ठाऊक नाही. बोमन यांच्या कुटुंबात त्यांच्या 90 वर्षीय मातोश्री, पत्नी आणि दोन मुले, सून आणि नातू आहेत. बोमन यांना दोन मोठ्या बहिणीसुद्धा आहेत. बोमन यांची पत्नी जेनोबियासोबतची पहिली भेट त्यांच्या बेकरीत झाली होती.  वयाच्या 24 व्या वर्षी बोमन  जेनोबियासोबत लग्नगाठीत अडकले होते. त्यांच्या लग्नाला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. 


आज बोमन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या फॅमिली अल्बममधील अशी काही छायाचित्रे दाखवत आहोत, जी क्वचितच कुणी पाहिली असावीत. चला तर मग पाहुयात बोमन यांच्या स्वीट लिटील पारसी फॅमिलीची ही खास छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...