आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special Some Interesting Facts About Tina Munim

वयाच्या 21व्या वर्षी केली करिअरला सुरुवात, जाणून घ्या टीना यांच्या आयुष्यातील FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे टीना मुनीम, उजवीकडे पती अनिल अंबानीसोबत टीना - Divya Marathi
डावीकडे टीना मुनीम, उजवीकडे पती अनिल अंबानीसोबत टीना
मुंबई- टीना मुनीम गुरुवारी (11 फेब्रुवारी) 59वा वाढदिवस साजरा करत आहे. गुजराती फॅमिलीमध्ये जन्मलेल्या टीना यांना बालपणापासूनच ग्लॅमर वर्ल्डमध्ये नाव कमावण्याची इच्छा होती. त्यांना अभिनय आणि मॉडेलिंगचा छंद होता. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी 'देस परदेस' सिनेमातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'लूटमार', 'मनपसंद', 'रॉकी', 'सौतन' आणि 'कर्ज'सारखे हिट सिनेमे बॉलिवूडला दिले.
अभिनेत्री होण्याची नव्हती इच्छा...
टीना यांनी 1975मध्ये इंटरनॅशनल टीन प्रिन्सेस स्पर्धा, अरुबामध्ये (स्पेन) भारताकडून सहभाग घेतला होता. येथे त्यांनी मिस फोटोजेनिक आणि मिस बिकिनीचा पुरस्कार नावी केला. या शोमध्येच देव आनंद यांनी टीना यांना पहिल्यांदा पाहिले होते. त्यानंतर त्यांनी 'देश परदेश' सिनेमासाठी टीना यांना साइन केले. मात्र, टीना यांनी खूप विचार केल्यानंतर हा सिनेमा साइन केला. कारण त्यांना फॅशन डिझाइनिंग करण्यासाठी पॅरिसला जायचे होती.
जाणून घ्या टीना यांच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक FACTS...
- गुजराती जैन कुटुंबात जन्मलेल्या टीना यांचे खरे नाव निव्रुती मुनीम आहे.
- टीना 1 भाऊ आणि 9 बहिणींमध्ये सर्वात लहान आहे.
- टीना यांची थोरली बहीण भावना मॉडेलिंगमध्ये होती, म्हणून टीना यांनीसुध्दा मॉडेलिंगमध्ये यायची इच्छा होती.
- टीना पती अनिल अंबानीपेक्षा वयाने दोन वर्षे मोठ्या आहेत. टीना यांचा जन्म 1957 तर अनिल यांचा 1959मध्ये झालाय.
- टीना यांना अनमोल आणि अंशुल ही दोन मुले आहेत.
- 2008मध्ये टीना यांच्या बर्थडेवेळी अनिल यांची एक लग्झरी याट खरेदी केली होती. तिने नात टीयान (Tian) होते. हा नाव अनिल आणि टीना यांच्या नावाचे पहिले अक्षय मिळून बनवले होते.
- टीना ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईमध्ये हार्मोनी फाऊंडेशन चालवतात. अशाचप्रकारे न्यू आर्टिस्ट्सना प्रमोट करण्यासाठी त्या हार्मोनी आर्ट फाऊंडेशन चालवतात.
- टीना यांना शॉपिंगसाठी अमेरिकेत जायला आवडत नाही. त्यांच्या सांगण्यानुसार त्या खूप खर्च करतात आणि त्यांना आवडले तर त्या संपूर्ण मार्केट खरेदी करू शकतात. म्हणून त्या अशा ठिकाणी जाणे टाळतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टीना यांचे निवडक PHOTOS...