आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारुण्यात असे दिसत होते सलमानचे 'पापा', तुम्ही पाहिलेत का हे 13 PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलीम खान यांचे जूने फोटो
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील आणि हिंदी सिनेसृष्टीचे प्रसिध्द स्क्रिप्ट राइटर आणि डायलॉग राइटर सलीम खान 24 नोव्हेंबरला 80वा बर्थडे साजरा करत आहेत. सलीम खान यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1935ला इंदोरमध्ये झाला. त्यांचे वडील पोलिस विभागात होते.
दोनवेळा अडकले लग्नगाठीत-
1964मध्ये सलीम खान यांनी महाराष्ट्रच्या ब्राम्हण कुटुंबातील सुशीला चरकसोबत लग्न केले. लग्नानंतर सुशीला यांनी नाव बदलून सलमा खान ठेवले आणि 27 डिसेंबर 1965मध्ये त्यांनी पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचे सलमान खान आहे. सलीम आणि सलमा यांना चार मुले आहेत. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलवीरा. 1981मध्ये सलीम खान यांनी गतकाळातील प्रसिध्द डान्सर हेलन यांच्याशी लग्न केले. दोघांना एकही मुल नाहीये, मात्र त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे. तिचे नाव अर्पिता आहे.
हीरो होण्यासाठी आले होते-
सलीम खान यांना हीरो व्हायचे होते, म्हणून ते मुंबईला आले. सुरुवातीला त्यांनी छोट्या-छोट्या भूमिका केल्या. जवळपास 14 सिनेमांत कॅमियो भूमिका केल्या, परंतु अभिनेता म्हणून त्यांची छाप पडली नाही. अभिनेत्याच्या रुपात त्यांनी 'तीसरी मंजिल' (1966), 'सरहदी लूटेरा', 'दीवाना' (1967) आणि 'वफादार' (1977)सारखे सिनेमे केले.
मैत्री जेव्हा जोडी बनली-
सलीम खान जेव्हा अभिनयात नशीब आजमावत होते, तेव्हा 'सरहदी लुटेरा'साठी जावेद अख्तर डायलॉग लिहित होते. जावेद यांना ही संधी सिनेमाच्या डायलॉग राइटरची तब्येत बिघडल्याने मिळाली होती. येथून सलीम आणि जावेद यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. दोघांनी 70 आणि 80च्या दशकात एकूण 24 सिनेमांच्या पटकथा लिहिल्या. त्यामधील 20 सुपरहिट झाले. सलीम-जावेद यांची जोडी स्क्रिप्ट राइटर म्हणून रुपेरी पडद्यावर चमकली.
मैत्रीत आली दरार-
1982मध्ये 'शक्ती' सिनेमादरम्यान यांच्या मैत्रीत दरार आली आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले. दोघांनी शेवटचा 1987मध्ये आलेला 'मिस्टर इंडिया' सिनेमा एकत्र केला. ही जोडी तुटल्यानंतर जावेद अख्तर यांनी लिखाण सुरु ठेवले, परंतु सलीम खान यांनी 1996नंतर स्टोरी राइटिंगला अलविदा म्हटले.
सलीम खान अभिनेता बनले नसले तरी ते आपल्या तारुण्यात मुलांसारखे हँडसम होते. त्यांच्या बर्थडेनिमित्त divyamarathi.com तुम्हाला दाखवत आहे, सलीम खानच्या तारुण्यातील काही खास फोटो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलीम खान यांचे तरुण असतानाची निवडक छायाचित्रे...