आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special Some Unknown Facts About Farah Khan

6 फिल्मफेअर अवॉर्ड केले आहेत नावी, कॉलेजच्या दिवसांत येत नव्हता डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे फराह (वरती), खाली वडील कामरान खानसोबत फराह आणि उजवीकडे पती शिरीषसोबत फराह - Divya Marathi
डावीकडे फराह (वरती), खाली वडील कामरान खानसोबत फराह आणि उजवीकडे पती शिरीषसोबत फराह
फराह खान 51 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 9 जानेवारी 1965ला मुंबईमध्ये झाला. फिल्मफेअर कामरान खान तिचे वडील होते, फराहची आई मेनका ईराणी स्क्रिन रायटर हनी ईराणीची बहीण आहे. तिच्या धाकट्या भावाचे नाव साजिद खान आहे. फरहान आणि जोया अख्तर फराहचे मावस भाऊ-बहीण आहेत.
9 वर्षे लहान आहे फराहचा पती...
फराहने 9 डिसेंबर 2004मध्ये फिल्म एडिटर शिरीष कुंदरसोबत लव्ह-मॅरेज केले. विशेष म्हणजे, शिरीष तिच्यापेक्षा 9 वर्षे लहान आहे. फराहला तीन मुले आहेत, आन्या, दीवा आणि जार. यांचा जन्म 2008मध्ये सोबतच झाला.
मल्टी टॅलेंटेड फराह-
फराहने करिअरची सुरुवात सपोर्टिंग डान्सर म्हणून 'जलवा' (1987)मधून केली. तिला पहिला ब्रेक 1992मध्ये रिलीज झालेल्या आमिर खान स्टारर 'जो जीता वही सिकंदर' सिनेमातून मिळाला. सिनेमात फराहने 'पहिला नशा' गाण्याला कोरिओग्राफ केले होते. तिला 6 वेळा फिल्मफेअर उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिका पुरस्कार मिळाला आहे.
येत नव्हता डान्स-
तुम्हाला माहित झाल्यास आश्चर्य वाटेल, की अनेक सुपरहिट गाण्यांना कोरिओग्राफ करणा-या फराहला कॉलेजच्या दिवसांत डान्स येत नव्हता. ती मायकल जॅक्सनच्या एका गाण्याला पाहून प्रेरित झाली होती. त्यानंतर तिने डान्स शिकण्यास सुरुवात केली आणि स्वत:चा एक डान्स ग्रुपसुध्दा तयार केला.
दिग्दर्शनातही हिट-
'मै हू ना'पासून (2004) दिग्दर्शनापासून सुरुवात करणा-या फराहने 'ओम शांती ओम' (2007), 'तीस मार खां' (2010) आणि 'हॅप्पी न्यू ईअर' (2014)सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. 'मै हूं ना'साठी तिला उत्कृष्ट दिग्दर्शिका फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2012मध्ये रिलीज झालेल्या 'शिरीन फरहाद की तो निकल पडी' सिनेमातून तिने अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.
छोट्या पडद्यावरही आहे अॅक्टिव्ह-
फराह छोट्या पडद्यावरही अॅक्टिव्ह आहे. फराह 'इंडियन आयडल', ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिए’, ‘एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा’ आणि ‘फराह की दावत’सारख्या अनेक शोमध्ये दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फराहच्या आयुष्यातील निवडक फोटो...