आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special Some Unseen And Rare Photos Of Jeetendra

कधीकाळी जितेंद्र हेमावर करायचे जीवापाड प्रेम, भावी पत्नीला सोडून करणार होते लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेमा मालिनीसोबत जितेंद्र - Divya Marathi
हेमा मालिनीसोबत जितेंद्र
मुंबई: ‘जंपिंग जॅक’ नावाने लोकप्रिय अभिनेते जिंतेद्र 74 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 7 एप्रिल 1942ला अमृतसर येथील एका उद्योगपतीच्या घरी झाला. जितेंद्र यांचे खरे नाव रवि कपूर आहे. त्यांनी 1974मध्ये लाँग टाइम गर्लफ्रेंड शोभा कपूरसोबत लग्न केले. परंतु क्वचितच लोकांना ठाऊक आहे, की जितेंद्र यांचे अभिनेत्री हेमा मालिनीवर प्रेम होते. ते शोभाला सोडून हेमासोबत लग्न करण्याचा विचार करत होते. परंतु ऐनवेळी धर्मेंद्र दोघांमध्ये मधे आले आणि हे नाते संपुष्टात आले.
हेमावर केले प्रेम, परंतु होऊ शकले नाही लग्न...
'दुल्हन' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जितेंद्र यांचा हेमा मालिनीवर जीव जडला. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोघांच्या लग्नाची बातमी जितेंद्र यांची बालमैत्रीण शोभा कपूरला कळाली आणि त्यांनी धर्मेंद्र यांना हेमाला समजावून सांगण्याची जबाबदारी सोपवली. अखेर हे लग्न मोडले. नंतर धर्मेंद्र यांनी हेमासोबत लग्न केले. धर्मेंद्र यांचे हे दुसरे लग्न आहे.
बालपणापासून सोबत होते जिंतेद्र आणि शोभा...
शोभा कपूर 14 वर्षांच्या असताना त्यांना जितेंद्रवर प्रेम झाले होते. त्यावेळी जितेंद्र बॉलिवूड स्टार नव्हते. जितेंद्र बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत होते, त्यावेळी शोभा ब्रिटीश एअरवेजमध्ये काम करत होत्या. नोकरीमुळे शोभा नेहमी परदेशात राहत होत्या आणि जितेंद्र यांना भेटू शकत नव्हत्या.
सिनेमांत यश मिळाल्यानंतर 1973मध्ये जितेंद्र आणि शोभा यांच्या लग्नाचा तारिख ठरली. परंतु जिंतेद्र यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकलल्या गेला. त्याचदरम्यान हेमा जिंतेद्र यांच्या आयुष्यात आली होती. परंतु अनेक अडचणींचा सामना करून अखेर जितेंद्र-शोभा 18 ऑक्टोबर 1974ला लग्नगाठीत अडकले. दोघांना मुलगी एकता आणि मुलगा तुषार ही दोन मुले आहेत.
200 सिनेमांत केले काम...
जवळपास 200 सिनेमांत काम केलेल्या जितेंद्र यांचा सर्वात पहिला ब्रेक निर्माता व्ही शांताराम यांनी दिला. 'गीत गाता पत्थरो ने' सिनेमात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. जितेंद्र यांनी फिल्मी करिअरमध्ये 'जीने की राह', 'मेरे हुजूर', 'फर्ज', 'हमजोली', 'कारवां', 'धरमवीर', 'परिचय', 'खुशबू', 'तोहफा' आणि 'हिम्मतवाला'सह अनेक हिट आणि अविस्मरणीय सिनेमे केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, जेव्हा व्ही. शांताराम भडकले जितेंद्र यांच्यावर...