Home »Gossip» Birthday Special Story Of Actress Prachi Desai

12 वीत असताना केला होता टीव्हीवर डेब्यू, आज आहे या राज्याची टुरिझम ब्रँड अॅम्बेसेडर

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 12:11 PM IST

मुंबई - प्राची देसाई आज 29वा वाढदिवस साजरा करत आहे. प्राचीने 17 व्या वर्षी (12वीमध्ये असताना) टीव्हीवर करिअर सुरू केले होते. प्राचीने तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात 2006 मध्ये एकता कपूरच्या कसमसे द्वारे केली. त्याच शोमुळे प्राची घराघरात बानी वालिया नावाने ओळखली जाऊ लागली. टीव्हीवर यशाची चव चाखल्यानंतर प्राचीने बॉलिवूडमध्ये नवी इनिंग सुरू केली. तिने ‘रॉक ऑन’ चित्रपटातून डेब्यू केला. तिचा दुसरा चित्रपट 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' ला जोरदार यश मिळाले. त्यानंतर तिला गोव्याची टुरिझम ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले. चित्रपट क्षेत्रातील पार्श्वभूमी नसतानाही तिने स्वबळावर स्थान निर्माण केले आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या प्राची देसाईबाबत आणकी काही Facts..

Next Article

Recommended