आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे सनीची Love Life: अमृतापासून लपवून ठेवले होते लग्न, डिंपलसोबतही होते अफेअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सनी देओलने नुकतीच वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. सनीने 1983 मध्ये 'बेताब' या सिनेमातून अभिनेत्री अमृता सिंहसोबत इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. सिनेमाच्या शूटिंगच्या काळात या दोघांचे सूत जुळले होते. विशेष म्हणजे त्याकाळात पूजासोबत सनी देओलचे लग्न झाले होते. मात्र सनीने त्याच्या लग्नाची गोष्ट अमृतापासून लपवून ठेवली होती.
कुटुंबीयांच्या दबावामुळे केले होते सनीने लग्न...
सनीचे लग्न बिझनेस अॅग्रीमेंटनुसार झाले होते. बेताब सिनेमाच्या रिलीजपूर्वी सनीच्या लग्नाची गोष्ट उघड होऊ नये, असे धर्मेंद्र यांचे म्हणणे होते. कारण त्यामुळे सनीच्या रोमँटिक इमेजवर निगेटिव्ह प्रभाव पडला असता. सिनेमाच्या रिलीजच्या काळात सनीची पत्नी पूजा लंडमध्ये होती. त्याकाळात सनी लपूनछपून पूजाला भेटायला लंडनला जात असे. जेव्हा वृत्तपत्रांमध्ये सनीच्या लग्नाच्या बातम्या प्रकाशित झाल्या, तेव्हा सनीने त्याचे खंडन केले होते.

घरच्यांचा होता सनी-अमृताच्या नात्याला विरोध
अमृता सिंगच्या मातोश्री रुखसाना सुल्तान यांना सनीसोबतचे अमृताचे नाते पसंत नव्हते. सनी देओलची आई प्रकाश कौरसुद्धा या नात्याच्या विरोधात होत्या. कारण सनी त्यावेळी विवाहित होता.

अमृताने तोडले सनीसोबतचे नाते...
सनीच्या लग्नाची गोष्ट अमृता सिंगला समजल्यानंतर तिने त्याच्याशी असलेले तिचे नाते संपुष्टात आणले होते. त्यानंतर अमृता सिंगचे नाव रवि शास्त्रीसोबत जुळले होते. मात्र हे नातेसुद्धा फार काळ टिकू शकले नव्हते. दोघे लवकरच विभक्त झाले. त्यानंतर अमृताच्या आयुष्यात सैफ अली खानची एन्ट्री झाली. सैफ आणि अमृताने 1991 मध्ये लग्न केले होते.

डिंपलसोबत झाले होते सनीचे लग्न?
सनीच्या लग्नाविषयी समजल्यानंतर अमृता सिंगने त्याच्या आयुष्यातून काढता पाय घेतला होता. मात्र त्यानंतर सनीच्या आयुष्यात डिंपल कपाडियाची एन्ट्री झाली. असे म्हटले जाते, की सनीने तो विवाहित असतानासुद्धा डिंपलला पत्नीचे स्थान दिले होते. दोघांनी त्यांचे लव्ह लाइफ अनेक दिवस कॅमे-यापासून लपवून ठेवले होते. कुणालाही त्यांच्या नात्याविषयी सुगावा लागू नये, याकडे दोघांनी कटाक्षाने लक्ष दिले होते. जेव्हा लोकांना त्यांच्या नात्याविषयी कळले, तेव्हासुद्धा दोघांनी त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही. इतकेच नाही तर सनी आणि डिंपलने लग्न केल्याची चर्चा त्याकाळात रंगली होती.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सनी देओलचे अमृता सिंग आणि डिंपल कपाडियासोबतचे निवडक PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...