आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 व्या वर्षी गायिका बनण्यासाठी घरातून पळाली होती टूनटून, जाडेपणामुळे बनली कॉमेडियन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उत्तर प्रदेश येथील एका लहानशा गावात जन्मलेल्या टूनटून आज जर  असत्या तर त्या 94 वर्षाच्या असत्या. खूप कमी लोकांना माहीत आहे की, टुनटुनचे खरे नाव उमा देवी खत्री होते. लहानपणीच टुनटुन यांच्या आईवडिलांचे निधन झाले होते. आईवडिलांच्या मृत्यूनंतर टुनटुनला तिच्या काकांनी सांभाळले. गायिका बनण्याची होती टुनटुन यांची इच्छा...
 
- टुनटुन यांना अगोदर गायिका बनायचे होते त्यासाठी ते वयाच्या 13 व्या वर्षी मुंबईला पळून आल्या.
- मुंबईत आल्यानंतर त्यांची भेट संगीतकार नौशाद यांच्यासोबत झाली आणि त्यांना चित्रपटासाठी गाणे देण्याची विनंती केली. 
- टुनटुन यांनी  नौशाद यांना गाणे दिले नाही तर बिल्डींगवरुन उडी मारुन जीव देईल अशी धमकीही दिली. नौशाद यांनी टुनटुन यांची छोटीशी ऑडिशन घेतली आणि त्यांचा आवाज पसंत आल्याने एक गाणे गाण्यास दिले.
- यानंतर त्यांनी 'अफसाना लिख रही हूं' हे गाणे गायले. जे फार लोकप्रिय झाले. या गाण्याच्या जोरावर त्यांना नंतर अनेक गाणे गायची संधी मिळाली. 
 
जाडेपणामुळे बनली कॉमेडियन
- टुनटुन  यांची जवळपास 40-45 चित्रपटात गाणे गायले. त्यानंतर  आशा भोसले, लता मंगेशकर, नूरजहां यांसारख्या गायिकांच्या काळात त्यांना काम मिळणे थोडे मुश्किल झाले. 
- 1950 मध्ये टुनटुन  बाबुल चित्रपटात दिसल्या. त्यांना त्या चित्रपटात एक साईड कॉमिक रोल देण्यात आला. 
- असे म्हणतात की, त्यांना त्यांच्या जाडेपणामुळे विनोदी भूमिका मिळाल्या. 
- चित्रपटातील त्यांचे कॉमिक रोल प्रेक्षकांना आवडले आणि मग त्यांनी लगेचच त्यांची एक वेगळी ओळख मिळवली.
- लहान पण लक्षात राहतील अशा अनेक भूमिका त्यांनी केल्या.
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, कोणी केले टुनटुनचे नामकरण...
बातम्या आणखी आहेत...