आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: मंगेशकर नव्हे हर्डीकर आहे आडनाव, विष देऊन झाला होता दीदींना जीवे मारण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. लतादीदींचा आज वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय गोमंतक कुटुंबात त्यांचा झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.
पहिले गाणे गायल्यावर मिळाले होते 25 रुपये-
लता यांना पहिल्यांदा स्टेजवर गाणे गाण्यासाठी 25 रुपये मिळाले होते. याला त्या पहिली कमाई मानतात. लताजी यांनी पहिल्यांदाच 1942मध्ये मराठी सिनेमा 'पहिली मंगळागौर'साठी गाणे गायले होते. लता यांचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि आशा भोसले यांनी सर्वांनी संगीत क्षेत्राचीच निवड केली आहे.
का नाही केले लग्न?
लता मंगेशकर यांनी लग्ना का केले नाही. याचे उत्तर त्या स्वत: देतात. लता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की घरात सर्व सदस्यांची जबाबदारी माझ्यावर होती. अशावेळी अनेकदा लग्नाचा विचार मनात आला मात्र तो प्रत्यक्षात कधीच अमलात आणला नाही. खूप कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली होती. 1942मध्ये वयाच्या 13व्या वर्षी लताजी यांच्या डोक्यावरून वडिलांची सावली हरपली. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली.
सिनेमांत छोट्या-छोट्या भूमिका कराव्या लागल्या-
लता मंगेशकर यांचे वडील शास्त्रीय संगीताचे खूप मोठे प्रशंसक होते, म्हणून कदाचित ते लताजी यांच्या गायनाच्या विरोधात होते. 1942मध्ये त्यांच्या वडीलाचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची अर्थित स्थित ढासळली आणि लता यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांत छोट्या-छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली.
लता दीदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आणखी बरंच काही जाणून घेऊयात त्यांच्यविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...