आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday Spl: जेवढी सोज्वळ तेवढीच बोल्ड आहे अनुष्का शेट्टी, जाणून घ्या तिच्याविषयी A to Z

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचा आज वाढदिवस आहे. तिने वयाच्या 37 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 7 नोव्हेंबर 1981 रोजी मंगळूरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या अनुष्काचा याचवर्षी 'बाहुबली 2' हा चित्रपट रिलीज झाला आणि तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसची सगळी गणितं मोडित काढत नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. अनुष्काने बाहुबली सीरिजसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 

2005 साली 'सुपर' या तेलगू सिनेमाद्वारे तिे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने साऊथमध्ये अनेक सिनेमांत अभिनय केला. तामिळ आणि तेलगू सिनेसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. अनुष्काने बाहुबली व्यतिरिक्त Vikramarkudu (2006), अरुंधति (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम सीरिज सारख्या हिट सिनेमांत काम केले आहे.   

'बाहुबली 2'मध्ये अनुष्काचे सोज्वळ रुप सगळ्यांना घायाळ करणारे होते. पडद्यावर अनुष्का जेवढी सोज्वळ दिसते, तेवढ्याच तिने बोल्ड भूमिकादेखील साकारल्या आहेत. आज अनुष्काच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊया, तिच्याविषयी सर्वकाही आणि सोबतच पाहुया, तिचे सोज्वळ आणि बोल्ड रुपसुद्धा...  
बातम्या आणखी आहेत...