फाइल फोटो- डावीकडे नंदिता दास, उजवीकडे शबाना आझमीसोबत (वरती), खाली बाल्ड लूकमध्ये नंदिता
भारतीय सिनेसृष्टीत एकापेक्षा एक उत्कृष्ट कलाकार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री नंदिता दाससुध्दा त्यातील एक आहे. सिनेसृष्टीत नंदिता अभिनेत्रीशिवाय दिग्दर्शक म्हणूनसुध्दा प्रसिध्द आहे. तिने 'फायर', 'अर्थ' आणि 'बवंडर'सारख्या सिनेमांत काम केले आहेत.
7 नोव्हेंबरला नंदिता 46वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तावर divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी...
'फायर' सिनेमातून एकवटली चर्चा-
बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत दमदार अभिनय करून नाव कमवणा-या नंदिताला दीपा मेहताच्या 'फायर' सिनेमातून चांगलीच ओळख मिळाली. या सिनेमातील शबाना आझमी आणि नंदिता दासच्या लिप-लॉकने चर्चा एकवटली होती. सिनेमात समलैंगिकांचे प्रेम दाखवण्यात आले होते.
'वॉटर'साठी केले होते टक्कल-
नंदिताने दीपा मेहताच्या 'वॉटर' सिनेमासाठी टक्कल केले होते. परंतु हिंदु संघटनेच्या विरोधामुळे हा सिनेमा तयार होऊ शकला नाही. नंतर दीपाने नवीन स्टारकास्टसह हा सिनेमा तयार केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या नंदिताच्या आयुष्यातील रंजक गोष्टी...