आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणीच्या मैत्रीणीसोबत जायदने केलेय लग्न, शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लग्नावेळी वधू मलायका पारेख आणि नवरदेव जायद खानसोबत ऐश्वर्या राय बच्चन आणि संजय दत्त)
मुंबई- 2004मध्ये दिग्दर्शक फराह खानच्या 'मै हू ना' सिनेमात लकी (लक्ष्मण प्रसाद शर्मा)च्या भूमिकेने प्रकाशझोतात आलेला जायद खान आज 35 वर्षांचा झाला आहे. 5 जुलै 1980 रोजी मुंबईमध्ये जन्मलेला जायद टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेते संजय खान आणि अभिनेत्री जरीन खान यांचा मुलगा आहे. जायद चार-बहीण भावंडांमध्ये (सिमोन, सुझान, फराह आणि जायद) सर्वात लहान आहे. त्याने वेल्हम बॉइज स्कूल, डेहरादून आणि कोडाइकनाल इंटरनॅशनल स्कूल, कोडाइकला (तामिळनाडू) येथून शिक्षण घेतले. त्याची पत्नी मलायका पारेख त्याच्या शाळेत शिकत होती. जायदने लंडन फिल्म अॅकाडमीमधून फिल्म मेकींगचे धडे गिरवले.
2003मध्ये केले पदार्पण-
जायदने 2003मध्ये दिग्दर्शक संगीत सिवान यांच्या 'चुरा लिया है तुमने' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमात त्याची बालपणीची मैत्रीण ईशा देओलने मुख्य अभिनेत्रीचे काम केले होते. मात्र जायदला खरी ओळख 'मै हू ना' (2004) सिनेमातून मिळाली. हा सिनेमा त्याच्या आतापर्यंतचा सर्वात हिट सिनेमा मानला जातो. त्यानंतर 'शादी नंबर वन' (2005), 'दस' (2005), 'फाइट क्लब' (2006), 'मिशन इस्तांबुल' (2008) आणि 'शराफत गई तेल लेने' (2015)'सारख्या सिनेमांत काम केले.
तीनवेळा मलायकाला केले होते प्रपोज-
जायद खान 2005मध्ये बालपणीची मैत्रीण मलायका पारेखसोबत बोहलल्यावर चढला. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते, की त्याने मलायकाला तीनवेळा प्रपोज केले होते. तिन्ही वेळच्या रिंग अजूनही मलायकाकडे आहेत. असे सांगितले जाते, की जायद आणि मलायका लग्नापूर्वी 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांची पहिली भेट कोडाइकनाल इंटरनॅशनल स्कूल (तामिळनाडू)मध्ये शिक्षण घेत असताना झाली होती. जायद आणि मलायका आता जिदान आणि आरिज या दोन मुलांचे आई-वडील आहेत.
लग्न आणि रिसेप्शनमध्ये पोहोचले होते अनेक सेलेब्स-
जायद आणि मलायकाच्या लग्न आणि रिसेप्शनमध्ये माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन. अभिनेते संजय दत्त, विनोद खन्ना, हृतिक रोशन, राजकिय नेते उध्दव ठाकरे, पी.चिदंबरम आणि आणखी बरेच सेलेब्स पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जायद-मलायकाच्या लग्नाचे काही photos...