आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Spl: Bollywood Actor Aloknath Turn 60 Today

B\'day: ‘संस्कारी बाबूजीं’नी वयाची 59 वर्षे केली पूर्ण, स्वतःवरचेच जोक्स करतात एन्जॉय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: आलोकनाथ)
मुंबई: बॉलिवूडमध्ये ‘संस्कारी बाबूजीं’ म्हणून प्रसिद्ध असलेले आणि पित्याच्या भूमिका अमर करणारे ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ आज आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 10 जुलै 1956 रोजी दिल्लीमध्ये झाला. आलोकनाथ राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून पदवीधर आहेत. आतापर्यंत त्यांनी 100 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शिवाय बारांहून अधिक टीव्ही मालिकांमध्येही ते झळकले आहेत.
1982 मध्ये त्यांनी 'गांधी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या सिनेमात त्यांच्या पात्राचे नाव तौय्यब मोहम्मद होते. त्यानंतर 1987मध्ये आलेल्या 'कामिग्नि'मध्ये त्यांनी नायकाची भूमिका साकारली. या सिनेमात त्यांच्यासह गतकाळातील प्रसिध्द अभिनेत्री टीना मुनीम होत्या. 'विवाह', मेरे जीवन साथी', 'मैंने प्यार किया', 'कयामत से कयामत तक', 'दयावान', 'सपने साजन के', 'तिरंगा', 'दीवाना', 'हम आपके है कौन', 'परदेश', 'जीत', 'मुझे कुछ कहना है', 'कभी खुशी कभी कम' यांसह अनेक सिनेमांमध्ये वडिलांच्या भूमिका साकारून ते बॉलिवूडचे 'बाबूजी' झाले.
गेल्यावर्षी आलोकनाथ यांच्या नावाने झाला होता जोक्सचा वर्षाव
गेल्यावर्षी सोशल नेटवर्किंग साइट्सवर त्यांच्या नावाने जोकची सिरीज सुरू झाली होती. या जोक्समुळे सुरुवातीला रागावलो होतो. मात्र, आता हे विनोद स्वत:च एन्जॉय करत असल्याची प्रतिक्रिया आलोकनाथ यांनी दिली होती. आलोकनाथ यांनी मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, परदेस, ताल, विवाह, एक विवाह.. ऐसा भी यांसह अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये चरित्र भूमिका साकारल्या आहेत. या सर्वाचा आधार घेऊनच आलोकनाथ यांच्यावर जोक्स तयार करून ते सोशल नेटवर्किंग साइट्सद्वारे पसरवले गेले होते. या प्रकारावर आधी संतप्त झालो होतो, मात्र आता हेच विनोद एन्जॉय करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आलोकनाथ यांचे काही Unseen Pics सोबत त्यांच्यावर करण्यात आलेल्या जोक्सविषयी सांगत आहोत...