आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: या अभिनेत्रीमुळे राज कपूरची पत्नी गेली होती घर सोडून, आता इतका बदलला लुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला आज 13 ऑगस्ट रोजी 81 वर्षाच्या झाल्या आहेत. 1936 साली तामिळनाडू, चेन्नई येथे जन्मलेल्या वैजयंतीमाला आता चित्रपटांपासून दूर आहेत. त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. अनेक हिट चित्रपट दिलेल्या वैजयंतीमाला यांच्या आई यासुद्दा 40 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. 15 वर्षाच्या असताना केला होता बॉलिवूडमध्ये प्रवेश..
 
- वैजयंतीमाला यांनी वयाच्या 15 व्या वर्षी चित्रपटात पदार्पण केले होते. 1951 साली त्यांनी बहार या चित्रपटात प्रथम काम केले होते. 
- त्यांनंतर त्यांनी 1954 मध्ये 'नागिन' आणि 1955 साली 'देवदास' या चित्रपटात काम केले होते. 
-  'देवदास' मध्ये वैजयंतीमाला यांनी चंद्रमुखीची भूमिका केली होती. ज्यासाठी त्यांना प्रथम फिल्मफेयर अवॉर्ड (बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस) चा पुरस्कारही मिळाला होता.  पण त्यांनी तो घेण्यास नकार दिला होता. 
- वैजयंती यांचे म्हणणे होते की, त्यांनी या चित्रपटात सहअभिनेत्रीची नव्हे तर मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती. 
- वैजयंतीमाला यांनी  'न्यू डेल्ही', 'नया दौर', 'आशा', 'साधना' आणि 'मधुमती' या चित्रपटात काम केले.
- वैजयंतीमाला यांना 'साधना' आणि 'मधुमती'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. 
 जेव्हा राज कपूर यांची पत्नी वैजयंतीमालामुळे राहिली होती हॉटेलमध्ये..
- वैजयंतीमाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही त्यावेळी वादाने भरलेले होते. 
-1961 साली 'गंगा जमुना'च्या सेटवर त्यांचे अफेअर दिलीप कुमार यांच्यासोबत सुरु झाले. याअगोदर दिलीप कुमार कामिनी कौशलसोबत रिलेशनशीपमध्ये होते. 
- 60 च्या दशकात वैजयंती यांचे नाव राज कपूर यांच्याबरोबरही जोडले गेले होते. 
- असे म्हणतात की, राज कपूर यांना वैजयंतीमाला यांच्यासोबत लग्न करायचे होते पण ते तेव्हा विवाहीत होते आणि त्यांना मुलेही होती.
- वैजयंतीमालासोबत पतीच्या अफेअरने नाराज असलेल्या कृष्णा यांनी घर सोडले होते आणि मुलांना घेऊन त्या हॉटेलमध्ये राहत होत्या. जवळपास 4 महिने त्या मुंबईतील नटराज हॉटेलमध्ये राहिल्या होत्या. 
- राज कपूर यांनी त्यामुळे वैजयंतीमालासोबत असलेले नाते तोडले. त्यानंतर वैजयंतीमाला यांनी 1968 साली चमनलाल यांच्यासोबत लग्न केले. त्यांना आता एक मुलगा आहे त्याचे नाव सुचिन्द्र बाली आहे. 

पुढच्या 4 स्लाईडवर वाचा, वैजयंतीमाला यांच्याशी निगडीत काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...